गुन्हेगारी

प्रेम प्रकरण उघड केल्याच्या रागातून सख्या बहिणीने आपल्याच सख्या बहिणीचा केला खून

प्रेम प्रकरण उघड केल्याच्या रागातून सख्या बहिणीने आपल्याच सख्या बहिणीचा केला खून

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या तीन चारी जवळ नगर-मनमाड महामार्गालगत भन्साळी ट्रॅक्टर जवळ रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी (वय-१७) हिने नुकतीच आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती .आत्महत्या झालेल्या मुलीची बहीणच आरोपी निघाली असून तिनेच आपले प्रेम प्रकरण उघड होऊ नये यासाठी सख्या बहिणीचा ओढणीच्या साहाय्याने खून केल्याची घटना उघड झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.३० सप्टेंबर २०२२ रोजी गळफास घेतल्याची घटनेची पोलिस दप्तरी नोद झाली होती.या घटनेचा तपास चालु असतांना याच घरातून दुसरी तिच्या बहिणीची मिसिंगची तक्रार आली होती.त्यामुळे तिच्यावर संशय आला होता.आरोपी तरुणी हिचे श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील आकाश राजेंद्र कांगुने याच्यासोबत प्रेम संबंध होते तसेच आरोपी मुलगीचे प्रेम संबंध असलेला मुलगा आकाश राजेंद्र कांगुणे याच्यासोबत घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना यातील मयत मुलगी हर्षदा हिने तिला विरोध केल्याने आरोपी तरुणी सृष्टीने मयत हर्षदा हिचा कापडी ओढणीने गळा आवळून तिला जिवे ठार मारले.पोलिसांनी याचा सखोल तपास करून मयत मुलीची आई संगीता नवनाथ बानकर वय ४० यांच्या फिर्यादीवरून मयत मुलीची मोठी बहीण सृष्टी नवनाथ बानकर (19) हिच्यावर भादवी कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा बुधवारी उशिरा दाखल केला आहे. प्रियकरासाठी मोठ्या बहिणीनेच लहान बहिणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने कोपरगाव तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे