सामाजिक

कोपरगाव तालुक्यातील  सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक  अरुण खरात यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सत्कार

कोपरगाव तालुक्यातील  सामाजिक कार्यकर्ते तथा साहित्यिक  अरुण खरात यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सत्कार

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक, महिला,तमाशा कलावंताच्या समस्यावर निंरतर काम करणारे अरुण खरात यांचा नुकताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. अरुण खरात यांचे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल रामदास आठवले यांनी घेतली असून आठ दिवसांपूर्वीच अरुण खरात यांना फोनद्वारे संपर्क साधून सत्कार सोहळ्यास निमंत्रित केले होते. निराधार ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरुण खरात यांनी खूप प्रयत्न केले होते. उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी अरुण खरात सतत लढा देत असतात. शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावरती हा सत्कार सोहळा पार पडला असून रामदास आठवले यांचे हस्ते अरुण खरात यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, पप्पू बनसोडे, दीपक गायकवाड, विजय वाकचौरे, भीमा बागुल, सुनील मोकळ, संजय विघे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे