सामाजिक

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व यश कोचिंग क्लासेस यांच्यावतीने रायटिंग पॅड व मेडिकल किट चे वाटप

लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व यश कोचिंग क्लासेस यांच्यावतीने रायटिंग पॅड व मेडिकल किट चे वाटप

 संपादक- रवींद्र जगगाप

 कोपरगाव प्रतिनिधी – लायन्स क्लब ऑफ कोपरगाव ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून कोपरगाव शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये नेहमीच छोटे आणि मोठे सामाजिक कार्य करत असते. येत्या 15 मार्च 2022 पासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुलांच्या बुद्धिमत्तेच्या बरोबर भौतिक सुविधांची गरज असते हीच गरज ओळखून लायन्स क्लब कोपरगाव व यश कोचिंग क्लासेस यांच्या वतीने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावीच्या एकूण 300 विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड चे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थी शाळेत खेळत असताना किरकोळ इजा होत असतात यावेळी प्राथमिक उपचार शाळेतच मिळावे या उद्देशाने प्राथमिक उपचार पेटी प्राथमिक व माध्यमिक शाळेला देण्यात आल्या.

        यावेळी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव चे अध्यक्ष राम थोरे,सचिव अक्षय गिरमे,खजिनदार सुमित भट्टड, ज्येष्ठ सभासद विजय नानकर,यश कोचिंग क्लासेस चे संचालक इनामदार सर व सुतावणे सर  तसेच शाळेचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर सर,प्रथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  मीना पाटणी मॅडम , उपमुख्याध्यापक आर बी गायकवाड सर, कुळधरण सर, शिरसाळे सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकरंद कोऱ्हाळकर सर यांनी केले. यावेळी लायन्स क्लब च्या  सर्व सभासदांनी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे सुरेश गोरे सर यांनी केले 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे