पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी विलासराव आहिरे यांची निवड
पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी विलासराव आहिरे यांची निवड
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव(प्रतिनिधी) -राजकीय सामाजिक क्षेत्रातील अग्रणी नेते व आंदोलक कार्यकर्ते विलासराव आहिरे यांची पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव येथे पार पडलेल्या छोटेखानी बैठकीत त्यांना हे पत्र देण्यात आले.पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान पठाण यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांना हे नियुक्तिपत्र प्रदान केले.



विलासराव आहिरे यांचा राजकीय अनुभव व संघटन कौशल्य लक्षात घेऊन पक्षाने ही जबाबदारी त्यांचेवर सोपवली असून पक्ष बांधणीची धुरा ते यशस्वीरित्या पार पाडतील अशी आमची खात्री आहे.अल्पावधीतच ते पक्षाचा विचार सर्वदूर पोचवतील यात कोणतीही शंका नसल्याचे प्रतिपादन शेरखान पठाण यांनी केले.
याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर गायकवाड, नईम भाई मनियार, अशोकराव जमधडे, सुनिलराव जाधव, विठ्ठलराव सूरभैय्या, दिपकराव मोरे आदित्य सूरभैय्या रशीदभाई बागवान ,सलीमभाई शेख ,महिला आघाडीच्या उषाताई बागुल,आयेशा शेख,लता गायकवाड, आदी कार्यकर्ते बहुसंख्येने हजार होते.




