स्व.सागर राजु जाधव स्मृती प्रतिष्ठानचा ज्ञान सागर पुरस्कार युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांना जाहिर

स्व.सागर राजु जाधव स्मृती प्रतिष्ठानचा ज्ञान सागर पुरस्कार युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांना जाहिर
स्व.सागर राजु जाधव स्मृती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत प्रत्येक वर्षी सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , वैद्यकीय , कला , साहित्य , क्रीडा , उद्योग , पर्यावरण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गुणगौरव केला जातो व या वर्षाचा पुरस्कार दिला जाणारा ” ज्ञानसागर ” स्मृती गुणगौरव पुरस्कारासाठी स्व.सागर राजु जाधव स्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या वतिने श्री किशोर वसंतराव चोरगे यांची निवड केली आहे .


सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे हे अनेक सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात 2016 – 17 या वर्षापासून अविरत अनोखा गणपती उत्सव सोशल मिडिया मार्फत साजरा करून प्रत्येक्षात श्री गणेशाची स्थापना न करता रस्त्यावर फिरणाऱ्या मनोगरूग्ण महिलांकरता उत्सवाची वर्गणी विलाजा करता त्याच्या मार्फत दिली जाते तसेच इमारत बांधकाम श्रेत्रातील कामगारांना शासनाची मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे व इतर योजना हि मिळवुन दिल्या जातात तसेच मराठी शाळा आधुनिक झालीच पाहिजे या करता हि आंदोलन करत आहे शिक्षणात विषमता आल्याने समाजातील समानता नष्ट होत आहे म्हणुन मराठी शासकिय शाळा टिकल्या पाहिजे त्यांच आधुनिकीकरण झालं पाहिजे कारण असं झालं तरच समाजातील विषमता दुर पण त्या करता शिक्षणात समानता आली पाहिजे या विषयावर हि अविरत काम केलं जातं आहे इ.अनेक उपक्रम हे निर्विवाद निस्वार्थ पणे अखंडतेने राबवितात आणि मानव सेवेचं काम सतत करत असतात म्हणुन राज्य स्तराचा ” ज्ञानसागर ” पुरस्कार या वर्षी स्व सागर राजु जाधव प्रतिष्ठानने युवा सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांना जाहिर केला आहे .




