राजकिय

धामोरीच्या काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

धामोरी येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय निवृत्ती शेलार व त्यांच्या सहका-यांनी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटात प्रवेश केला त्याबदद्दल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला

धामोरीच्या काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश 

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगांव :-तालुक्यातील धामोरी येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय निवृत्ती शेलार व त्यांच्या सहका-यांनी भारतीय जनता पक्ष, कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला.सर्वश्री. दिलीप निवृत्ती शेलार, राजेंद्र निवृत्ती शेलार व प्रदिप दत्तात्रय भूसे यांनीही यावेळी कोल्हे गटात प्रवेश केला.  श्री. दत्तात्रय निवृत्ती शेलार म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या अध्यक्षपदाची धूरा युवानेते व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या खांद्यावर आली असून त्यांनी युवकांचे संघटन उत्तमरित्या करून तालुक्यावर कोसळलेल्या प्रत्येक आपत्तीत येथील रहिवासीयांचे संकट हरण करण्यांसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न केले आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सत्ता असो अगर नसो पण येथील प्रत्येक कार्यकर्ता हा आपला आहे त्याच्या सुख-दुःखात वेळप्रसंगी त्याच्या मागे उभे राहण्यांत मोलाची भूमिका बजावली आहे. अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या सत्काराचे निमीत्त जरी असले तरी त्यांच्या कार्याने आपण भारावून गेला त्यामुळे येथून पुढे भारतीय जनता पक्ष आणि कोल्हे गटाच्या कार्यात सकीय राहुन धामोरीसह पंचकोशीच्या विकासात साथ करणार असल्याचे ते म्हणाले.  युवानेते विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने तळागाळातील प्रत्येकाचा विचार करून त्यांच्या विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले. देशाच्या सर्वोच्च पदावर त्यांनी एका आदिवासी महिलेला स्थान देवुन जगात इतिहास घडविला आहे. धामोरीच्या शेलार बंधुनी जो निर्णय घेतला त्याला साथ देवुन प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे