सामाजिक

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश

पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश देतांना आ. आशुतोष काळे.

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ४ लाखाचा धनादेश

 संपादक :-रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब  नागरी सहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ४ लाख रुपयांचा धनादेश नुकताच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारसांना देण्यात आला.संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या कर्जदारांचा ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे. संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील मयत कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचा देखील संस्थेने रु.५,००,०००/- रुपयांचा विमा उतरविलेला होता. कर्जदार गोविंद काशिनाथ पन्हाळे यांचे अपघाती निधनानंतर संस्थेने ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद स्व.गोविंद पन्हाळे यांच्या वारसांना पॉलिसिपोटी ४ लाख रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटना विमा रक्कम मंजूर केली.त्या रक्कमेचा धनादेश नुकताच मयत गोविंद पन्हाळे यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती मंगल गोविंद पन्हाळे यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक, अनिल महाले, महेंद्र काळे, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, बन्सी निकम, सौ. मेघा कडवे, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर, मॅनेजर मंगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

            

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे