गोरख देवडे यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसचिव पदी निवड

गोरख देवडे यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसचिव पदी निवड
संपादक :- रवींद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील गोरख देवडे अनेक वर्षांपासून सामाजिक कामकाज करत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसचिव पदी त्यांची निवड करण्यात आली आहे केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे शासन देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहे. या पदाच्या माध्यमातुन पक्ष संघटन मजबूत करुन उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व राज्य व केंद्र शासनाची ध्येय धोरणे, विविध योजना तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाच्या वतीने कामकाज केले जात असते . गोरख देवडे यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रताप सिंह शिंदे यांनी त्यांची उत्तर महाराष्ट्र सहसचिव पदी निवड केली आहे. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते त्यांना या नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे पुढील कार्यास देखील बिपिन दादा कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या आहे माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार मोर्चाचे कामकाज करणार आहोत यापूर्वी देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कामकाज करत आलो आहे असे गोरख देवडे याप्रसंगी म्हणाले. त्यांची उत्तर महाराष्ट्र सहसचिव पदी नियुक्ती झाल्यावर त्यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहे. याप्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्यासह शंकर बिराडे सतीषराव रानवडे संजय खरोटे अनिल जाधव सुजल चंदनशिव सोमनाथ ताकवले आदि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत




