“संविधानाने महिलांना सन्मान दिला” – अँड.सोनल पोळ
“संविधानाने महिलांना सन्मान दिला” – अँड.सोनल पोळ
समाज व्यवस्थेत महिलांना कोणताही सन्मान नव्हता मात्र संविधानाने महिलांना सर्वोच्च सन्मान दिला असे प्रतिवादन अँड.सोनल पोळ यांनी व्यक्त केले
भारतीय संविधान दिना निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने कोपरगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला या वेळी अँड.सोनल पोळ, अँड.सुषमा गरुड,अँड करुणा सोनवणे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या वेळी बोलताना अँड.सोनल पोळ म्हणाल्या की भारतीय समाजात एका बाजूला महिलांना देवी म्हणून पुजले जात असताना दुसरीकडे महिलांना शिक्षणा पासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले होते मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने महिलांना सर्व हक्क देऊन महिलांना सन्मान प्राप्त करून दिला असून आज सर्व राष्ट्रपती, पंतप्रधान न्यायाधीश यांच्या पासून सर्वच महत्वाच्या पदावर महिला कार्यरत असून हा सन्मान फक्त संविधानामुळे मिळाला आहे


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.सुषमा गरुड यांनी केले तर आभार अँड.करुणा सोनवणे यांनी व्यक्त केले
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ म्हणाले की भारतीय संविधानाने समता, स्वातंत्य, बंधुता, सामाजिक न्याय तसेच मूलभूत हक्क दिले असून सर्वांना समान संधी दिली आहे मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारत घडवायचा असेल तर अजूनही खूप मोठा समाज न्यायापासून वंचित आहे मात्र त्या साठी संविधानाचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे या वेळी अशोकराव शिंदे,मंगेश औताडे, अमित आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते


