थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा- अँड.नितीन पोळ कोपरगाव
थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा- अँड.नितीन पोळ
कोपरगाव
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळा तर्फे १ लाख रुपयांच्या थेट कर्ज योजनेसाठी इच्छुक असणाऱ्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.त्याचा मातंग समाज व तत्सम जातीतील बेरोजगार तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे


लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष नितीन पोळ यांनी नुकतीच अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अहमदनगर जिल्हा कार्यालयाला भेट दिली असून कार्यालयाच्या कर्मचारी यांच्या सोबत थेट कर्ज वितरण योजनेची माहिती घेतली असून आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की थेट कर्ज योजनेच्या माध्यमांतून मोबाईल सर्व्हिसिंग,रिपेअरिंग,इलेक्ट्रिशयन,ब्युटी पार्लर,स्टोअर,ड्रेस डिझायनिंग,टेलरिंग, फूड प्रोसेसिंग, झेरॉक्स,ज्यूस सेंटर अशा विविध व्यवसायांसाठी कर्ज दिले जाणार आहे.सदर कर्ज प्रकरणाचे फॉर्म सोमवार २८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२२ या कालावधी मध्ये जिल्हा कार्यालयात फाँर्म घेणे व देणे सुरू आहे.त्या साठी वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ या कार्यालयाचा पत्ता – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय अहमदनगर या ठिकाणी उपलब्ध आहेत कर्जासाठी लाभार्थ्यांची निवड ही निवड समिती लॉटरी पद्धतीने करणार आहे.मातंग समाजातील शहरी व ग्रामीण भागांतील सुशिक्षित तरुण तरुणींनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच सदर योजनेचा लाभ घेताना दलालांपासून सावध रहावे कर्ज घेतल्या नंतर शक्यतो व्यवसाय उभा करावा आपल्या नंतर दुसऱ्याला देखील लाभ व्हावा याची काळजी म्हणून कर्ज फेड नियमित करावी एकदा कर्ज घेऊन परत केल्यास पुन्हा जादा रकमेचे कर्ज मिळू शकते त्यामुळे जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतींनी या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन या पत्रकाद्वारे केले आहे
महाराष्ट्रात रावणाचे हे रावणेश्वर मंदिर सविस्तर माहितीसाठी खालिल लिंक दाबा व चँनलला सबस्क्राईब


