क्रिडा व मनोरंजन

के.जे. सोमैया महाविद्यालयाचे विवेक कर्डिले या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये सहभाग.

के.जे. सोमैया महाविद्यालयाचे विवेक कर्डिले या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय डव्हेंचर कॅम्पमध्ये सहभाग.

कोपरगाव येथील के.जे. सोमैया  कला,वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विवेक कर्डिले टी.वाय.बी.कॉम याची मनाली हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय ॲडव्हेंचर कामासाठी १० ते १९ नोव्हेंबर २०२२ या काळात निवड होऊन त्याने तो क‌ॅम्प  यशस्वीरित्या पूर्ण केला सदर क‌ॅम्पमध्ये महाराष्ट्र,झारखंड, बिहार व ओरिसा हे राज्य सहभागी झाले होते. विवेक कर्डिले आणि महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून १४ स्वयंसेवक सहभागी झाले होते. तर अहमदनगर जिल्ह्यातून ३ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ऍड. संजिव  कुलकर्णी, मा. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यास कार्यक्रम अधिकारी प्रो. (डॉ.) बी. एस.गायकवाड, प्रो. (डॉ.) एस. एस. नागरे, प्रो. (डॉ.) एस्. बी. भिंगारदिवे,     डॉ. एस. के. बनसोडे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे