सामाजिक

स्वच्छ आरोग्य सोबत पर्यावरणाची जोपासना करा.- स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके

 

स्वच्छ आरोग्य सोबत पर्यावरणाची जोपासना करा.– स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके

वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखतांना आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.हे करतांना वृक्षारोपण आणि पर्यावरणाची जोपासना करण्याचे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले.कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालयाचे वतीने पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांचे जन्मदिवस निमित्त कृतज्ञता सप्ताहिचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहात विविध क्षेत्रातील विशेष निमंत्रितांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत वनश्री सुशांत घोडके उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश कातकडे‌ होते.

जाहिरात
जाहिरात

या प्रसंगी वनश्री घोडके पुढे म्हणाले, कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.ही ज्ञानाची पवित्र गंगा आहे.शालेय शिक्षणासोबत पर्यावरणाची जाण असणे महत्त्वाचे आहे.पर्यावरणाचा समतोल राखतांना वन्यजीवांचे संरक्षण महत्वाचे आहे.असे सांगत स्वच्छता,आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धनचे विद्यार्थींकडून वदवून घेत.विनोदी गोष्टीने समारोप केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सुरेश कातकडे‌ यांनी,खडतर परिस्थितीवर मात करणारा विद्यार्थी दीपस्तंभ ठरत असतो.असे सांगत शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सांगतली.या प्रसंगी महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल सुशांत घोडके यांचा सन्मान केला.तसेच शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबवून वृक्षारोपण करण्यात आले.मुख्याध्यापक सुरेश कातकडे, उपमुख्याध्यापिका मंगला राजेभोसले,पर्यवेक्षिका काशिबाई जगताप,शिक्षक काशिनाथ लव्हाटे,शहाजी सातव,अरुण पोळ,मनिषा पाटील,रतन दवंगे,किरण बोळीज, मंगलदास बत्तासे, जयश्री आंबरे,सुरेखा शेळके यांचेसह शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन मनिषा पाटील यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे