कृषीवार्ता

पन्नास हजार रूपयांचे अनुदानाचा कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना लाभ-

पन्नास हजार रूपयांचे अनुदानाचा कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना लाभ-
कोपरगांव :-    कोपरगांव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमीत कर्जफेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन सदरची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तात्काळ जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, कोपरगांव तालुक्यात ७ हजार ४७७ कर्जदार शेतक-यांपैकी १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमित शेती कर्ज भरले असुन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सदर कर्जदार शेतक-यांना पन्नास हजार रूपयांचे अनुदान रक्कम मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला होता.
जाहिरात
जाहिरात
जाहिराती
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे