जेऊर कुंभारीतील नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
जेऊर कुंभारीतील नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समाजमंदिर जेऊर कुंभारी येथे संत जनार्धन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव व दुर्गा आय केयर हॉस्पिटल (नाशिक) तसेच जेऊर कुंभारी ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जेऊर कुंभारी ग्रामपंचायत चे युवा सदस्य प्रदिप दिपकराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.सदर शिबिराला जेऊर कुंभारी ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासूनच नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेणे साठी गर्दी केली होती.या शिबिरात ज्या लोकांना डोळ्यांचा त्रास होतो.ज्यांचे सतत डोकं दुखते,मानेच्या शिरा दुखतात चक़र येते किंवा डोळ्याला नेहमी पाणी येते ,जवळचे व लांबचे कमी दिसते अशा २५० गरजुंनी या शिबिराचा लाभ घेतला त्यात मोतीबिंदू झालेल्या नागरिकांचे श्री संत जनार्धन स्वामी हॉस्पिटल(कोपरगाव),दूर्गा आय केयर हॉस्पिटल(नाशिक) येथे ऑपेरेशन करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.भालेराव यांनी दिली आहे. याप्रसंगी उपसरपंच ताराचंद लकारे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर चव्हाण,यशवंत आव्हाड, अनिता वक्ते, वैशाली भोंगळे, गंगुबाई जाधव,संजय भोंगळे,संजय वक्ते ,मधुकर वक्ते सतिश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद बारसे, संतोष बोरावके, नंदू बोरावके, संगीता वक्ते आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे प्रदिप गायकवाड यांनी सांगितले व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.




