कृषीवार्ता

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने शिरसगाव,ता.कोपरगाव येथे शेतकरी यशोगाथा कार्यक्रम संपन्न 

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने शिरसगाव,ता.कोपरगाव येथे शेतकरी यशोगाथा कार्यक्रम संपन्न 

२३ डिसेंबर,राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्ताने शिरसगाव, ता.कोपरगाव येथील शेतकरी यशोगाथा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रयोगशील शेतकरी,कृषी प्रश्नाचे अभ्यासक,लेखक श्री उत्तमराव बादशहा पुणे ब्राह्मणगाव यांचा सत्कार करून साजरा करण्यात आला.उत्तम पुणे यांनी आर्थिक परिस्थिती प्रतीकुल असतांना तोट्यात जाणारी शेती नफ्यात कशी आणली ,त्यासाठी बागायत शेती जिरायत बनवली. एका विहिरीवर ११ एकर क्षेत्रात ४ तुषार संचाने जलव्यवस्थापन करत पारंपरिक पिकातून शेतकरी ते ग्राहक विक्री करत यश मिळवल्यांचे त्यांनी सांगितले.काटेकोर पीक नियोजन, खर्चात बचतिचे अर्थशास्त्र यावर त्यांनी मार्गदर्शन केले.यानिमित्ताने वेगवेगळे क्षेत्रात यशवीरित्या काम करणारे अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. श्री विजय कुलकर्णी यांनी उक्कडगाव येथे दहा वर्षांपूर्वी वीस तरुणांचा कृषीखाते अंतर्गत बचत गट स्थापन करत गटातील शेतकऱ्यांना नाममात्र व्याजदराने गरजेच्या वेळेस पैसे कर्ज रूपाने दिले. शेतकरी शंभर टक्के वेळेवर व्याजासह रक्कम जमा करताहेत यातूनच त्यांच्या गटाचे भाग भांडवल दहा लाखापर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारचा यशस्वीरित्या बचत गट चालवणारे कोपरगाव पूर्व भागात एकमेव व्यक्ती ठरली आहे. त्यांनी केलेल्या व्यवस्थापनाचा फायदा इतर बचत गटांनाही व्हावा यासाठी मार्गदर्शन केले.श्री संतोष गोरखनाथ शिंदे पढेगाव यांनीही शेती व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींवर कशाप्रकारे मार्ग सोपा होईल यासाठी शेतीला अध्यात्माची जोड देण्यावर भाष्य केले.तर गोधेगावचे शिक्षक भोकरे सरानी जिवामृतचा आंबा फळबागेत वापर यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री भागिनाथ गायकवाड (डाळ मिल उद्योजक) यांनी केले.यावेळी शिवाजीराव जाधव,परसराम मापारी उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे