कोपरगाव शहरात सराफ दुकानांमध्ये सोने खरेदीच्या बहान्याने येवून सोन्याचे दागीने चोरणारे चोरटे कोपरगाव शहर पोलीसांनी पुणे जिल्हयातून मुद्देमालासह केले जेरबंद…
कोपरगाव शहरात सराफ दुकानांमध्ये सोने खरेदीच्या बहान्याने येवून सोन्याचे दागीने चोरणारे चोरटे कोपरगाव शहर पोलीसांनी पुणे जिल्हयातून मुद्देमालासह केले जेरबंद…
संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपासून सराफांचे दुकानात सोने खरेदीच्या बहान्याने दोन महीला व पुरूष येवुन सराफ व्यावसायिकांची दागीने खरेदी करण्याचे बहान्याने हात चलाखीने सोन्याचे दागीने चोरीचे सत्र सुरु होते. मागील वर्षापासून सराफांचे सोने चोरीबाबत गुन्हे उघडकीस येत नव्हते. कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला सराफ व्यावसायीकांचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि नं २४/२०२२ भादंवि कलम ३७९,३४ प्रमाणे व गुन्हा रजि नं-२३२/२०२२ भादंवि कलम ३७९,३४प्रमाणे अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासात पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोसई भरत दाते यांनी सखोल तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आले आहे. सदर गुन्हयातील आरोपी जया सचीन बडगुजर रा-भारतनगर, कात्रज, पुणे हीस अटक करुन तीच्याकडे गुन्हयाचा अनुषंगाने विचारपुस करून तपास केला असता तीने गुन्हा कबुली दिली असून तीने तीचे साथीदारासह कोपरगाव सराफ बाजारातून सोन्याचे दुकानातून चोरलेले दागोने, तसेच गुन्हा करताना वापरलेले वाहन मोबाईल फोन असा गुन्हयातील गेला माल तीच्याकडून हस्तगत केला आहे. तसेच आरोपीने राहुरी पोलीस स्टेशन हदोत अशा प्रकारचे सोने चोरी गुन्हा केल्याबाबत निष्पन्न झाले आहे हस्तगत केलेली मुद्देमाल खालीलप्रमाणे.
५५,०००/-रु. किंमतची २२ कॅरेट सोन्याचा नविन नेकलेस त्याचे वजन ११ ग्रॅम ६०० मि.ली वजनाचा आरोपीच्या ताब्यातून जप्त केले आहे तसेच
३,००,०००/- रु. किची लेन्सर बिट सीव्ही चारचाकी गाडी गाडी रजि.न. एम. एच. १२.एफ.८२०९ जु.वा.कि.अं.१३,०००/-रूकिंचा विधी कंपनीचा आकाशी रंगाचा बंद मोबाईल जु.वा. कि. अं १३,००० /- रू. किंवा ओप्पो कंपनीचा मिळया रंगाचा बंद मोबाईल ,१३,००० /- रू किमतीचा विवो कंपनीचा निळया रंगाचा बंद मोबाईल , ५०,०००/- रू. किमतिचे १०ग्रॅम वजनाचे मिनी गंठण आत्मा मलीक ज्वेलर्स कोपरगाव या दुकानातून आरोपीने चोरले भा.पु. का . २७ जप्त प्रमाणे. कि. अं
१८,८६०/- रू ४ प्रेम १०० मिली वजनाचे सोन्याचे कानातील बहुरानी जोड चैतन अलंकार या दुकानातून आरोपीने चोरलेले भा.पु. का. क २७ प्रमाणे जप्त जु.वा. कि. अं ४,६२,८६०/- रू. एकुण सदर यशस्वी कामगीरी मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो. अहमदनगर, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा.स्वाती भोर मैडम उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संजय सातव सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोनि वासुदेव देसले. सो. पोसई- भरत वात्ते, पोकों-सुंबे, काकड़े मपोको -दिवे, बनकर, धराडे चालक पोना-गोडसे, रहाणे अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर सायबर सेलचे पोकी-फुरकान शेख यांनी यशस्वीरीत्या कामगीरी केली आहे

