कृषीवार्ता

मा.आ. अशोकराव काळे यांचा पाठपुराव्यातून उभारलेले शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र कार्यान्वित पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका – आ.आशुतोष काळे

शहा १३२ के.व्ही. उपकेंद्र कार्यान्वित होण्यापूर्वी आ. आशुतोष काळे सबंधित अधिकाऱ्यांकडून सातत्याने आढावा घेतांनाचे क्षणचित्र.

मा.आ. अशोकराव काळे यांचा पाठपुराव्यातून उभारलेले शहा १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र कार्यान्वित पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका – आ.आशुतोष काळे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  – माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी १३२ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून शहा येथील कार्यान्वित झालेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रामुळे पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्रांचा भार होणार हलका होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील कोपरगाव तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आघाडी सरकारचे तात्कालीन ऊर्जा मंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्याने सुरेगाव येथे १३२ के.व्ही.विज उपकेंद्र मंजूर करून आणले होते. त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची १० एकर जागा देखील देण्यात आली होती. २०१५ मध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी या १३२ के. व्ही. विज उपकेंद्राचे भूमिपूजन देखील ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यावेळी हे भूमिपूजन होवू शकले नाही.

मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन आघाडी सरकार जावून युतीचे सरकार आले. त्यामुळे या १३२ के.व्ही.विज उपकेंद्राचा प्रश्न रेंगाळला होता. त्यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून या १३२ के.व्ही.विज उपकेंद्राला सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यास परवानगी देण्यात आली होती. या वीज उपकेंद्राचे काम पूर्ण होवून सर्व प्रकारचे तांत्रिक प्रात्यक्षिके देखील पूर्ण झाले असून हे वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले आहे. या वीज उपकेंद्राला कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, सुरेगाव,चासनळी उपकेंद्र जोडली जाणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदा या उपकेंद्रा अंतर्गत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील घरगुती व कृषी पंपांना पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर कोपरगाव उपकेंद्राचा भार कमी झाल्यामुळे कोपरगाव तालुक्याचा देखील वीजपुरवठा सुरळीत होणार आहे.त्यामुळे घरगुती व कृषी ग्राहकांनी माजी आमदार अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे