महाराष्ट्र

एकता, अखंडता आणि एकात्मता अबाधित ठेवा – आ.आशुतोष काळे

 

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी आ. आशुतोष काळे.

एकताअखंडता आणि एकात्मता अबाधित ठेवा – आ.आशुतोष काळे

रयत संकुलात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कोपरगाव प्रतिनिधी  – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे  सौ. सुशीलमाई काळे महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा – महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, दोन वर्षाच्या वैश्विक कोरोना महामारीच्या संकटाचा यशस्वी मुकाबला करून साजरा करीत असलेल्या ७४ व्या प्रजास्त्ताक दिनाला विशेष महत्व आहे. कारण महासत्ता असलेले अजूनही जगातील अनेक देश या महामारीमुळे त्रस्त आहेत. मात्र आपण इतर देशांच्या तुलनेत लवकर सावरलो. देशाच्या तमाम जनतेने दाखविलेला संयम, धैर्य, एकविचार व देशप्रेमामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.आपला देश आर्थिक महासत्ता व्हावा,जगात कुणाचीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार असे बलशाली राष्ट्र निर्माण व्हावे हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपली एकता,अखंडता आणि एकात्मता अशीच अबाधित ठेवा. या शक्तीवरच आपण कोणत्याही संकटाचा समर्थपणे सामना करू शकतो यामध्ये विशेषतःतरुणाईच्या जास्तीत जास्त योगदानाची गरज असल्याचा बहुमोल संदेश आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिला. तसेच कोपरगाव तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आ. आशुतोष  काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सुरक्षा विभाग व  शाळेच्या एन.सी.सी., कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी विद्यालयाच्या प्रांगणात आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन  दिलीपराव बोरनारे,  संचालक  वसंतराव आभाळे,शिवाजीराव घुले,श्रावण आसने, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे. सेक्रेटरी बाबा सय्यद, असी.सेक्रेटरी संतोष शिरसाठ तसेच कारखाना व उद्योगसमूहाचे सर्व पदाधिकारी, संभाजीराव काळे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, सदस्य डॉ.आय.के सय्यद,प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ, प्राचार्य सुभाष भारती, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य प्रकाश चौरे, प्राचार्या सौ. छाया काकडे. मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे तसेच सर्व शाळा महाविद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे