सामाजिक

संजीवनी उद्योग समुह तालुक्याची कामधेनू_ दवंगे.

संजीवनी उद्योग समुह तालुक्याची कामधेनू_ दवंगे.
कोपरगांव :- स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून तोच वारसा त्यांचे सुपुत्र बिपीनदादा कोल्हे यांच्यात असुन संजीवनी उद्योग समुह ही तालुक्याची कामधेनू आहे असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी केले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महेश्वर मंदिर (कोळपेवाडी) येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान, माजीमंत्री शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, डॉ. प्राची पवार यांच्या निलवंसत मेडीकल फाऊंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक, मणिशंकर आय हॉस्पीटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र कोळपे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, डॉ. मनोज बत्रा यांनी या शिबिराचा उद्देश सांगितला. कोळपेवाडी परिसरात व संजीवनी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले.  संचालक सोपानराव पानगव्हाणे, निवृत्ती कोळपे, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, शिवाजीराव कदम, बाळासाहेब पानगव्हाणे, पुंजाजी राऊत, शब्बीर भाई शेख, शब्बीर भाई पटेल, प्रकाश जुंधारे, पोपटराव जुंधारे, दिपक ढोणे , संजय कोळपे , किरण कोळपे , सचिन वाबळे , म्हाळु कोळपे , परसराम वाबळे , राजेंद्र देशमुख, वसंत लकडे , रामनाथ कोळपे , भिकन कोळपे ,मधुकर उगले ,अशोक ढोणे , सुखदेव कोळपे , दादा शिंदे , कारभारी कोळपे, पोपटराव निळकंठ, अर्जुन कोळपे , बाबासाहेब कोळपे , दत्तु कोळपे यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. अप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की, सहकार, शिक्षण, समाजकारण, सांस्कृतीक जडणघडण आणि सातत्याने आधुनिकतेची कास बिपीनदादा कोल्हे यांनी धरली असुन ते शेतकरी, सभासद, कामगार व त्यावर अवलंबुन असणाऱ्या प्रत्येक घटकांच्या उत्कर्षासाठी झटत असतात. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्त प. पू. रमेशगिरी महाराज यांनीही कारखाना कार्यस्थळावर येऊन बिपिनदादा कोल्हे यांना जन्मदिनाच्या सदिच्छा देऊन  त्यांच्या सामाजिक कार्याची वाहवा करून त्यांच्या कार्याला ईश्वरी पाठबळ सतत मिळत राहो असा आशीर्वाद दिला आहे.  ते आजही स्वतःचे वाढदिवस हार तुरे न स्विकारता त्या खर्चाला फाटा देऊन गुणवंत हुशार विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य देऊन तालुक्याचे आरोग्य सुदृढ कसे राहिल यासाठी अनेक शिबिरे ते घेत असतात. गोर गरिबांची सेवा, रुग्णांना आधार आणि स्वतःबरोबरच दुसऱ्याच्या उत्कर्षासाठी झटत राहणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यांत मध्यंतरी दोन वर्षे कोरोना आपत्तीमुळे खंड पडला पण हा उपक्रम समाजाच्या भल्यासाठी असल्याने तो अविरतपणे त्यांनी सुरू ठेवला आहे. अभ्यासु नेतृत्व विवेकभैय्या कोल्हे हे देखील सामाजिक कार्यात काकणभर जास्तच आहे. कोरोना काळात त्यांनी कोवीड सेंटर उघडून त्याद्वारे मोफत उपचार केले आहे, हजारो रुग्णांना दिलासा दिला त्यांचे हे कार्य अनमोल आहे असेही ते शेवटी म्हणाले. संचालक राजेंद्र कोळपे यांनी आभार मानले
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे