सामाजिक

विश्वनाथ उर्फ बाबा अय्यर यांना आत्मनिर्भर भारत विकास रत्न  पुरस्कार मिळाल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला सत्कार

 

विश्वनाथ उर्फ बाबा अय्यर यांना आत्मनिर्भर भारत विकास रत्न  पुरस्कार मिळाल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला सत्कार

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरातील श्री साई भगवती प्रतिष्ठानचे अध्यक्ष साईभक्त विश्वनाथ उर्फ बाबा अय्यर तसेच हाॅटेल स्वामी मद्रास शिर्डी याचे संचालक गेल्या ४० वर्षापासून शिर्डी शहरासह लगदच्या परिसरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमी अविरतपणे अन्नदान तसेच गरजुंपर्यंत आवश्यक मदत करतात शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते या केलेल्या कार्या बद्दल व तसेच कोव्हीड काळात साई मंदिर व भोजनालय बंद असताना त्या काळात देखील जीवाची पर्वा न करता गोरगरीब गरजूंसाठी अन्नदान करत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेल्या कार्याबद्दल दिल्ली येथील अच्युवेअर्स असोसिएशन ईकाॅनामिक्स रिसर्च व डेव्हलपमेंट या संस्थेने केलेल्या सर्वेत देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान करून आत्मनिर्भर भारतासाठी करत असलेल्या कार्याबद्दल नुकताच विश्वनाथ उर्फ बाबा अय्यर यांचा आत्मनिर्भर भारत विकास रत्न या पुरस्काराने अवाॅड सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली येथे सन्मानित करण्यात आल्याबद्दल शिर्डी येथे एका कार्यक्रमात साईभक्त विश्वनाथ अय्यर यांचा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे