सामाजिक

बेसबॉल चॅपियंन दोन युवतींचा पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

बेसबॉल चॅपियंन दोन युवतींचा पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने जाहीर सत्कार

संपादक :- रविंद्र जगताप

केजीएस काॅलेज कोपरगावच्या बेसबॉल संघाचे घवघवीत यश, नुकत्याच झालेल्या शालेय तालुकास्तरी बेसबॉल स्पर्धेत चमदार कामगीरी करून शालेय जिल्हास्तरी स्पर्धेतही चांगली कामगिरी केल्याने कु दुर्गा व कु वैष्णवी यांची महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघात निवड झाली, त्यांना सुनिल कुटे सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे, तसेच पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभत आहे, त्या ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थीनी असुन ,त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असताना , आपण खेळात ही अग्रेसर असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील युवतीसेनेच्या कु दुर्गा आव्हाड, वैष्णवी कासार यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे 2022/2023 चे आसाम येथे होणार्या नॅशनल स्पर्धे साठी त्यांची महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघात निवड झाली, या स्पर्धा 18 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यत होणार असुन, या स्पर्धेत देशातील 15/16 राज्याचे संघ सहभागी होणार आहेत ,त्यांनी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे निवास्तानी भेट दिली असता, पुणतांबा शहरशिवसेना, राहाता तालुका युवतीसेना, बालशिवसेना ,यांचे वतीने कु दुर्गा व कु वैष्णवी यांचा सत्कार युवतीसेनेच्या वतीने कु नेहा कुलकर्णी व कु चेतना गुढेकर यांचे हस्ते त्यांचा सत्कार करून आनंद व्यक्त केला, शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी त्यांचे कौतुक करत ,कोपरगाव शहरासह आपले नाव राज्यभरात चमकावले बद्दल अभिनंदन करून पुढील स्पर्धे साठी शुभेच्छा देऊन भविष्यातही शहरशिवसेना तुमचे पाठीशी खंबीरपणे उभे राहुन तुमचे समस्या सोडवण्यासाठी प्रयॅत्न करू असे सांगितले, तसेच पुणतांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिलीप मंडलीकसाहेब यांनी राहाता पोलीस ठाण्याचे वतीने पुणतांबा पोलीस ठाण्यात त्यांचा सत्कार करून स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्यात , याप्रसंगी उपआधिकारी कु नेहा कुलकर्णी, पुणतांबा शहर आधिकारी युवतीसेना कु चेतना गुढेकर , बालशिवसैनिक चि उत्कर्ष कुलकर्णी, निलेश गायकवाड, आदि जन उपस्थित होते,

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे