कोपरगावच्या जनतेला 100% शास्ती माफी द्या कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीची मागणी

कोपरगावच्या जनतेला 100% शास्ती माफी द्या कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी :-महाराष्ट्र शासनाने नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील रहिवाश्याकरिता थकीत मालमत्तावरील कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता अभय योजना २०२५ नुकतीच जाहीर केलेली आहे.कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना ईमेलद्वारे विनंती केली होती.

निवेदनात म्हटले होते की महाराष्ट्रात महानगरपालिका मालमत्ता करावर असणाऱ्या शास्ती बाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांना शास्ती माफ करण्यांचे किंवा त्यात सुट देण्यांचे अधिकार आहेत परंतु नगरपालिकामध्ये मा. मुख्याधिकारी साहेबांना शास्ती माफ करणे किंवा त्यात सूट देण्याचा अधिकार नाही
महाराष्ट्रातील नगरपरिषद,नगरपंचायत हद्दीतील रहिवाशांनवर असा अन्याय का?

वास्तविक पाहता नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशांचे उत्पन्न कमी व मर्यादित असते त्यांना त्या मानाने सुविधाही वेळेवर व नियमित मिळत नाही. काही वेळेस करदात्यांकडे पैसे असतीलच असे नाही तरीही करदाते प्रमाणिकपणे वेळेवर कर भरतात परंतु काही कारणास्तव त्यावर्षी नगरपरिषद कर भरणे शक्य न झाल्यास त्यास लगेच २% मासिक शास्ती लागु होते पर्यायाने थकबाकी शास्तीमुळे खुप वाढत जाते. व परिणामी तो करदाता फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला जातो असे असतानाही शास्ती मात्र सावकारी व जुलमी पद्धतीने वसुल केली जाते कारण मासिक २% म्हणजेच वार्षिक २४% होते. बैंकेच्या व्याजापेक्षा किती तरी पटीने जास्त आहे.म्हणून हा शास्ती ताबडतोब रद्द करावा व आपल्या काळात नगरपरिषद हद्दीतील सर्वसामान्य करदाता रहिवाशांवर होणारा अन्याय दुर करावा.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 19 मे 2025 रोजी नगर विकास विभाग (शासन निर्णय क्रमांक:-एमयुएम-२०२५/ प्र.क्र.७०/ नवि-१७) दि.१९ मे २०२५ प्रसारित करून महाराष्ट्रातील नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिका यांमधील मालमत्तावरील थकीत कर भरण्याकरिता प्रोत्साहन मिळावे म्हणून अभय योजना २०२५ जाहीर केली व त्यामध्ये महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायती व औद्योगीक नगरी अधिनियमन 1965 च्या कलम 150 अ (१) मध्ये सुधारणा केली त्या अनुषंगाने नगरपंचायत नगरपरिषद क्षेत्रातील मालमत्ता करावरील शास्तीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः सूट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्यामध्ये म्हटले आहे की 50% पर्यंतचे शास्ती माफ करण्याचे प्रस्ताव माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर करावे व 50% वरील प्रस्ताव हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आपला अभिप्राय देऊन मा.आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सादर करावे. यामध्ये फार वेळ जाण्याची शक्यता आहे तसेच थकबाकीचे प्रमाण देखील यामुळे वाढत जाईल अशी देखील शक्यता आहे. कोपरगाव नगर परिषदेच्या थकीत मालमत्ताकरा वरील शंभर टक्के शास्ती माफीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्याकडे सादर करावा.महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे दिनांक 19 मे 2025 च्या अगोदरच्या शास्ती माफ करण्याचा निर्णय
झालेला आहे परंतु असे दिसते आहे की त्यानंतरच्या थकीत रकमेवर मात्र शास्ती लागून येत आहे त्यामुळे लवकरात लवकर कोपरगाव नगर परिषदेच्या शास्ती माफीचा प्रस्ताव सादर करून कोपरगावातील मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती.
सदरची मागणी मान्य न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही कोपरगाव नगरपरिषद कार्यालयाबाहेर सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहोत तसेच त्यानंतरही यावर कुठलाही निर्णय न झाल्यास दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही कोपरगाव ते माननीय मुख्यमंत्री निवास पायी जाऊन त्यांचे याबाबत लक्ष्य वेधणार आहोत यादरम्यान कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास महाराष्ट्र शासन व कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव हे जबाबदार राहतील याची कृपया नोंद घ्यावी. असे संतोष कांतीलाल गंगवाल पद्माकांत शंकरराव कुदळे विकास उत्तमराव आढाव तुषार चारुचंद्र विद्वांस प्रवीण आप्पासाहेब शिंदे प्रकाश सदाशिव पंडोरे सर्व सदस्य कोपरगाव तालुका शेतकरी कृती समिती कोपरगाव यांनी म्हटले आहे

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6
पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा



