ब्रेकिंग

कोपरगाव नगर परिषद संचलित न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 1,3,4,6 व मा. माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात प्रवेश उत्सव साजरा

 

कोपरगाव नगर परिषद संचलित न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 1,3,4,6 व मा. माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयात प्रवेश उत्सव साजरा

कोपरगाव प्रतिनिधी :-चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील विद्यार्थी यांचा आज सोमवार दि. 16/6/2025 रोजी कोपरगाव नगर परिषद संचलित न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 1,3,4,6 व मा. माधवराव कचेश्वर आढाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालया मधील मागील व नवीन विद्यार्थी यांचा शाळा प्रवेशोत्सव व स्वागत कार्यक्रम नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. सुहासजी जगताप साहेब, उपमुख्याधिकारी श्री मनोज कुमार पापडीवाल साहेब,प्रशासन अधिकारी श्री. श्रीराम थोरात साहेब,कर निरीक्षक श्रीमती सोनवणे मॅडम, रामराव जाधव साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, फुलांचा वर्षाव व दीप ओवाळून करण्यात आले,

जाहिरात

कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला,सदर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातले शिक्षणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले व भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच सर्व 1 ली ते 8 वी मधील विद्यार्थी यांना शालेय गणवेश, पाठयपुस्तके, शुज व सॉक्स चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती भावना खैरनार मॅडम सूत्रसंचालन श्रीमती. अर्चना बोराडे मॅडम यांनी केले तसेच आभार श्रीमती स्नेहल वाघचौरे मॅडम यांनी मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी न. पा.शाळा नं 1,3,4,6 चे मुख्याध्यापक श्रीमती. बिबवे मॅडम, खैरनार मॅडम, खान मॅडम व साळुंके मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे