क्रिडा व मनोरंजन

के.जे.सोमैया (वरिष्ठ) व  के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी

के.जे.सोमैया (वरिष्ठ) व  के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी

 संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-   सोमैया विद्याविहार, मुंबई येथे सोमैया ग्रुपच्या वतीने पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन टॉस २०२२ क्रिकेट स्पर्धेत के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय, कोपरगाव शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी झाला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली.  सोमैया ग्रुप, विद्याविहार, मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यांतील सोमैया शिक्षण संकुलातील एकूण २४  संघांनी या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला होता.  पाच षटकामध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत अंतिम सामना के.जे.सोमैया महाविद्यालय, कोपरगाव विरूद्ध गोदावरी बायोरिफायनरीज लि., बैंगलोर यांच्‍यामध्‍ये खेळला गेला. या सामन्यात महाविद्यालयाच्‍या संघाने गोदावरी बायोरिफायनरीज लि., बैंगलोर संघाचा दणदणीत पराभव करून टॉस २०२२  चषकावर आपले नाव कोरले. आक्रमक फलंदाजी, अचुक गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण व योग्य नियोजन या जोरावर महाविद्यालयाच्‍या संघाने सलग पाच सामने जिंकून हा चषक जिंकला. कर्णधार डॉ. सुनील कुटे यांची उत्कृष्ट फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्‍यांना मिळाला. संघाचा ऑल राऊंडर खेळाडू रोहन यादव, उपकर्णधार डॉ. अभिजित नाईकवाडे, अष्‍टपैलू खेळाडू प्रा. सतिष पोखरकर,  गोलंदाज विजय पाचोरे, किशोर गायकवाड यांचे उत्कृष्ट प्रदर्शन व प्रा.गौरव जपे, प्रा. आमिर शेख, प्रा. दिपक बुधवंत, श्री. शुभम पाचोरे, श्री. सुमित गरुड, श्री. गणेश पवार,  श्री. रोहित लकारे यांचे अप्रतिम क्षेत्ररक्षण विजयश्री मिळवून देण्यात मोलाचे ठरले. महाविद्यालय क्रिकेट संघाचे मार्गदर्शक  प्रा. बी.आर. सोनवणे, व्यवस्थापक प्रा. सुजित पानगव्हाणे यांची भूमिका उल्लेखनीय होती. विजयी संघातील सर्व खेळाडूंना सोमैया ग्रुपकडून मेडल, मोमेन्‍टो, गिफ्ट हॅम्‍्पर व संघाला ट्रॉफी, फिरता चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात

टॉस २०२२ क्रिकेट स्पर्धेत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने सर्व खेळाडूंचा सत्कार कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. अॅड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त श्री.संदीपराव रोहमारे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस यादव यांच्या हस्ते करण्यात आला.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे