आदिनाथ सोसायटी व कर्मवीर नगर येथील ठराव मंजूर असलेली महत्वाची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करून द्यावी सामाजिक कार्यकर्ते,: निसार भाई शेख यांची पालिकेकडे मागणी.
आदिनाथ सोसायटी व कर्मवीर नगर येथील ठराव मंजूर असलेली महत्वाची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करून द्यावी सामाजिक कार्यकर्ते,:
निसार भाई शेख यांची पालिकेकडे मागणी.
संपादक :- रविंद्र जगताप
सुवर्ण जयंती नगरोतथान महाअभियान(जिल्हास्तर),
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजना अश्या विविध योजनेतुन भरगोस निधी मंजूर झाला असून त्यातून आमच्या आदिनाथ सोसायटी व कर्मवीर नगर येथील ठराव मंजूर असलेली कामे का वघळण्यात आली ? असे प्रश्न उपस्थित करीत आज सामाजिक कार्यकर्ते निसार भाई यांनी पालिकेत जाऊन मुख्याधिकारी शांताराम गोसावी साहेब यांची भेट घेतली व या भागातील सर्व समस्या परत एकदा त्यांच्या समोर सविस्तर पणे मांडल्या व कर्मवीर नगर येथील मोठ्या नाल्याचा प्रश्न त्वरित पावसाळा सुरू होण्याच्या आत त्यावर काहीतरी तोडगा काढुन नाला मोठ्या नळ्या टाकून बनवून पूर्ण करून द्यावा ,मुख्याधिकारी साहेबांना निसार भाईंनी मागच्या वर्षी संपूर्ण भाग पाण्यात होता त्या वेळेस तुम्ही आणि मी सोबत लोकांच्या घरात त्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करत होतो तीच वेळ परत नागरिकांवर येऊ नये त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये ,पंचनामे होऊन अनेक महिने उलटले तरीही त्यांना मागील नुकसान भरपाई देखील अद्याप मिळालेली नाही,याची आठवण देखील करून दिली.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

नव्याने हद्द वाढ झालेल्या भागात सुविधांचा अभाव असल्याने गेली अनेक वर्षांपासून एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने निसार भाई या भागात नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून पाठपुरावा करीत आहे बऱ्याच पाठपुरव्याला यश देखील आलं आहे परंतु काही कामे अजूनही बाकी आहे त्यात आदिनाथ सोसायटी येथील अंडररग्राऊंड गटार(ड्रेनेज),रस्ता,तसेच विजेचे पोल कर्मवीर नगर येथील गटार आदी कामांसाठी आपण विविध योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा ही मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोसावी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निसार भाईंना सांगितले की लवकरच आपल्या मागण्या पूर्ण करण्यात येईल त्या बाबत आमच्या हालचाली योग्य दिशेने सुरू असल्याचे सांगितले


