कोपरगावात ९ मार्च २०२३ पासुन लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव
कोपरगावात ९ मार्च २०२३ पासुन लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव
संपादक:- रविंद्र जगताप
९ मार्च २०२३ ला लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव अर्थात शिव का आरंभ,ज्या महोत्सवाची कोपरगावकर आतुरतेने वाट बघत असतात तो लायन्स बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात येत्या ९ मार्च २०२३ गुरुवार रोजी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय श्री आशुतोष दादा काळे यांच्या हस्ते होत आहे.यावर्षीचे या एक्सपोचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक्सपो पाच दिवसांच्या ऐवजी एक दिवस वाढवून सहा दिवसांचा करण्यात आला आहे. तसेच यावर्षी दहा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती चे निमित्त साधून या एक्सपोला शिवमय थीम देऊन शिवसृष्टी असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील विविध प्रसंग आणि देखावे पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाला मुख्य प्रायोजक म्हणून कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह, प्रायोजक संजीवनी ग्रुप, आणि सहप्रयोजक गोदावरी दूध संघ आणि समता पतसंस्था हे असणार आहेत. नऊ मार्चला सायंकाळी ठीक सहा वाजता शुभारंभ सोहळा आयोजित केला असून यावेळी कोपरगावात प्रथमच भव्य लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. दहा मार्च रोजी जळगावकर सराफ्फ प्रस्तुत सकाळी किल्ले बनवा स्पर्धा, दुपारी चित्रकला स्पर्धा तर सायंकाळी रायबा हेच का आपलं स्वराज्य हे महानाट्य सादर होणार आहे. ११ मार्च रोजी शिंदे इंग्लिश क्लासेस अकॅडमी आयोजित निबंध स्पर्धा तर सायंकाळी सहा वाजता तुलसीदास खुबाणी ज्वेलर्स प्रस्तुत लहान मुलांच्या डान्स स्पर्धाचे नियोजन आहे.

रविवारी १२ मार्च रोजी साई कुबेर डेव्हलपर्स आयोजित कोपरगावात पहिल्यांदाच रंगपंचमीच्या निमित्ताने रंग बरसे अर्थात हास्य कवी संमेलन होणार आहे सोमवार १३ मार्च रोजी रेनबो इंटरनॅशनल स्कूल प्रस्तुत वकृत्व स्पर्धा तसेच दुपारी चार वाजता कासलीवाल कॅपिटल व मनालीज मेकओव्हर च्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने सुपर वुमन हा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ठीक सहा वाजता तुलसीदास खुबानी ज्वेलर्स प्रस्तुत मोठ्या मुलांसाठी डान्स स्पर्धा होणार आहे आणि मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण समारंभ व नृत्यविष्कार होणार आहे. अशी माहिती सत्येन मुंदडा, यांनी दिली.
सदर बिजनेस एक्सपो २०२३ शहरातील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शन हॉल येथे होणार असून या ठिकाणी राज्यातील विविध प्रकारचे विक्रीचे एकूण शंभर तर खाऊ गल्ली मध्ये ५० असे १५० अद्यावत स्टॉल असणार आहेत यासोबतच विविध प्रकारच्या कृषी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यादरम्यान केले जाणार आहे कोपरगाव शहरातील व तालुक्यातील व्यवसायाला चालना मिळावी यासाठी स्थानिकांना अत्यल्प दरात स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच या भव्य दिव्य बिझनेस एक्सप्रेस मध्ये अल्प खर्चात खरेदी व विक्री करण्याचे सुवर्णसंधी उपलब्ध करण्यात आली आहे तरी या एक्सपोमध्ये संपूर्ण कोपरगाव शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत लिओ क्लबचे अध्यक्ष सुमित सिनगर व लीनेस क्लबच्या अध्यक्ष डॉक्टर अस्मिता लाडे तसेच राहुल नाईक यांच्या वतीने करण्यात आले आहे याप्रसंगी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरम सेठ बागरेचा, संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट चे चेअरमन माननीय श्री परागजी संधान, गोदावरी दूध संघाचे औताडे व समता चैरिटेबल ट्रस्ट चे संचालक संदिप कोयटे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी धरमशेठ बागरेचा यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, लायन्सच्या तीनही क्लबचे काम उल्लेखनीय असुन सामाजिक कामात ते अग्रेसर असतात कोरोना काळात त्यांनी मोठी मदत केली आहे.सत्येन मुंदडा यांनी यासंदर्भात कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली तर पराग संधान यांनीही या कार्यक्रमाचे स्तृती करुन शुभेच्छा दिल्या आहे.सुधीर डागा यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब ऑफ्फ कोपरगाव चे माजी अध्यक्ष राम थोरे तर आभार सुरेश शिंदे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे सर यांनी केले.


