महाराष्ट्र

शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी. शहरप्रमुख महेश कुलकर्णी

 

शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी. शहरप्रमुख महेश कुलकर्णी.

शिवसेनाप्रमुख वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन. सालाबादप्रमाणे परंपरा नुसार तिथीलाच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येते. त्यानुसार आज दि 10/3/2023 रोजी सकाळी दहा वाजता.शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. उपशहरप्रमुख नवनाथ वायकर यांच्या नेतृत्वाखाली आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व जयघोषात पुतोळ्याचे विधीवत पुजन .प्रमुख पाव्हुणे महिला आघाडी शिवसेना राहाता तालुकाप्रमुख सौ दिपालीताई पवार. पुणतांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिलीप मंडलीक साहेब .पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास आधिकारी प्रमोदभाऊ कानडे साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिपालीताई यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे देवाचे अवतार होते. त्यांच्या पराक्रमी व स्वाभिमानी बाणेदार वृत्तीचा आम्हा मायभगिणींना आजही आदरच त्यांनी त्याकाळात महिलांचे तक्रार समस्याबाबद ठोकशाहीचा वापर केला .असे सांगितले. मंडलिक साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेण्या पुरते नाही. डोक्यात घेण्यासारखे आहे . आजचे तरूणाईने नुसता मिरवणुकीला डिजे लावुन त्या तालावर नाचण्या पेक्षा शिवचरीत्र वाचन केले तर सर्व समाजातील भेद भाव संपेल व बंधुभाव वाढेल असे सांगितले. कानडे साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर आपन वाटचाल करत आहे असे सांगितले. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व सामान्य मानसाचे राजे होते. त्यांनी जाती पेक्षा मातीवर प्रेम कसे करायचे याचा आदर्श घालुन दिला आहे. त्यांनी गवताच्या काडीवर सुध्दा मानसाप्रमाणेच प्रेम केले असे सांगितले. सुहासराव वहाडणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एका जातीचे नव्हते ते बारा बलुतेदारांचे राजे होते त्यांनी समाजातील सर्व सामान्य माणूस बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे कार्य आजही प्रेरीत व प्रेरनादायी आहे. असे सांगितले. वंचित आघाडी चे दिपकभाऊ खंडागळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होऊन गेले. त्यांची जयंती आज चारशे वर्ष काय पण हजारो वर्ष याच पध्दतीने साजरी होईल असे ते राजे होते असे सांगितले. यावेळी मान्यवर प्रमुख पाव्हण्यांचा पुणतांबा शहरशिवसेना. महिला आघाडी. युवतीसेना.जेष्ठ शिवसेना यांच्या वतीने भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते सुहासराव वहाडणे. जेष्ठ शिवसैनिक शंकरराव शेलार.दादा पाटील ठुबे. यशवंतभाऊ ठुबे. राजाभाऊ गगे. भाऊसाहेब सांळुके. राजाभाऊ पवार. शाखाप्रमुख राहुल इंगळे. बुथप्रमुख अप्पासाहेब बनकर. संघटक प्रशांत परह्रे सर. युवतीसेना शहरप्रमुख चेतना गुढेकर. युवासेना सागर बोर्डे. फैय्याज शेख. सागर थोरात. राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष शैलेश कुलकर्णी. वंचित आघाडी चे दिपकभाऊ खंडागळे. ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अनिलभाऊ मोरे. रविभाऊ गुढेकर. गणेश मोरे. गणेश पिंगळे. मधुकर जगदाळे. बाबासाहेब जाधव. महिला आघाडी शिवसेना सौ सुरेखा जाधव. सौ चित्रा महेश कुलकर्णी. सौ ज्योती जेजुरकर. वृशाली कुलकर्णी. बालशिवसैनिक चि उत्कर्ष महेश कुलकर्णी. सोमनाथ गायकवाड.रमेश पर्हे. अनिल ढुमणे.भाऊ उगले .विलास वाकचौरे. सागर ठुबे. वसंतराव ठुबे. रुबाब कलेक्शनचे संचालक युवराज ठुबे.जेष्ठ नागरिक दादा धनवटे. गणेश जेजुरकर. शिवाजी मोरे. राहाता तालुका शेतकरी सेनेचे बबलु कुलकर्णी. पुणतांबा ग्रुप ग्रामपंचायत चे कर्मचारी सोनु धनवटे. पोलीस मित्र निलेश गायकवाड. प्रसिद्ध लाकडी फर्नीचर चे व्यापारी शिवाजी प्रधान. यांचे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवप्रेमी शिवभक्त उपस्थित होते. तसेच राहाता तालुका पोलिस स्टेशन चे मुख्य आधिकारी सुनिलजी गायकवाड साहेब त्यांचे सहकारी . व आमचे जिवलग मित्र मार्गदर्शक साकुरी येथील उपासनी माता भक्त. शिरडी साईबाबा संस्थान विश्वस्त अविनाश दंडवते पाटील. द्रोणा इंग्लीश मिडियमचे संचालक अनुपराज दंडवते पाटील.हार्डवेअरचे होलसेल व्यापारी अभिजित दंडवते पाटील. युवानेते शिवपार्वती लान्सेट संचालक प्रतापराव दंडवते पाटील. निशांतभाऊ दंडवते पाटील यांनी पुणतांबा येथे उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतले. याप्रसंगी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानुन शहरशिवसेनेच्या वतीने भगवी शाल देऊन सत्कार केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे