पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या कार्याचा गौरव
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या कार्याचा गौरव
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक पोलीस निरीक्षक येऊन गेलेत परंतु देसले सारखा शब्दाला जागणारा उच्चशिक्षित कर्तबगार डॅशिंग दबंग आणि सर्वात लोकप्रिय पोलीस खात्यात आपण कर्तव्य बजावत असताना कोपरगाव तालुक्यात जे माणुसकीचे बीज पेरलं ते अतिशय वाखण्याजोग आहे.सर्वच घटनांमध्ये आपली बहादुरी आपली कर्तबदारी ही आम्हाला जवळून बघायला मिळाली आहे प्रत्येक केस मध्ये आपला जो सिंहाचा वाटा असायचा आणि हिरारीने आपण त्याचा छडा लावायचे त्यामध्ये अनेक दरोडे असेल वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगारी असेल मोटरसायकल चोरीचे प्रकार असेल अपघात असेल आपण रस्त्यावर उतरून आपण अनेकांना न्याय मिळवून दिला कालचीच गोष्ट आपण कोपरगाव मध्ये उपोषण थांबवून त्यांना शब्दाप्रमाणे ताबडतोब मुलीला पकडण्यास यश मिळवले आणि तसेच प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम असो जयंती असो प्रत्येक कार्यक्रमात आपले मार्गदर्शन लाभले आहे असे कर्तबगार पोलीस निरीक्षक आमच्या तालुक्याला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो परंतु बदलीची जी बातमी आम्हाला कळाली त्या बातमीने अनेकांचे डोळे भरून आले तुम्हीच सांगा साहेब लेकराप्रमाणे माया करायची सगळ्यावर आणि अचानक बदलीची नोटीस दाखवून कोपरगाव तालुक्याला सोडून जायचं कोपरगाव तालुका हा ऐतिहासिक साधू संतांचा पवित्र असा तालुका आहे अजून सहवास लावला असता तर बरं झालं असतं परंतु आपल्या बदलीच्या बातमीने अनेकांचे डोळे भरून आले आहेत साहेब आपण कायम आमच्या आठवणीत असाल आणि आम्ही आपल्या नेहमी संपर्कात राहू आपले प्रेम असेच ठेवा कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आपले स्वागत आणि हार्दिक अभिनंदन आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या हातून अनेक गुन्हेगारांना शिक्षा होऊन सुसंस्कृत असा समाज घडो याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारुड आणि सिने अभिनेते राहुल भारुड यांनी श्री देसले साहेबांचा सत्कार करून गौरव केला



