राजकिय

शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीत सोसायटयांचा मोलाचा वाटा-कोल्हे

सुरेगांव सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाल्याबददल त्यांचा कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केल

शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीत सोसायटयांचा मोलाचा वाटा-कोल्हे 

कोपरगांव :-सहकारी सोसायटया हया शेतक-यांच्या विकासाच्या धमन्या असुन त्यांच्या आर्थीक उन्नतीत त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.तालुक्यातील सुरेगांव सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे सर्व तेरा उमेदवार विजयी झाल्याबददल त्यांचा कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलासराव वाबळे यांनी प्रास्तविक केले. माजी संचालक मोहनराव वाबळे यांनी कोल्हे कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली.  याप्रसंगी विजयी संचालक सर्वश्री. विलास वाबळे, गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, शंकरराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांचा सत्कार करण्यांत आला. या सोसायटीच्या निवडणुकीत विजयश्री खेचुन आणण्याकामी सर्वश्री. छबुराव माळी, पांडुरंग वाबळे, सोपानराव सोनवणे, यशवंत निकम, दिपकराव हुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याबददल त्यांचाही सत्कार करण्यांत आला. श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, जिल्हा सहकारी बँकेमार्फत सहकारी सोसायटयांना मोठया प्रमाणांत आर्थीक पाठबळ दिले जाते. गांवपातळीवर सभासद शेतक-यांना उदभवणा-या अडचणी सोडविण्यांचे काम सोसायटी व त्यांचे सर्व संचालक प्राधान्याने करत असतात. गेल्या दोन वर्षापासुन पर्जन्यमान चांगले होत असल्याने शेतकरी वर्गाला हंगामनिहाय शेती पीक कर्ज देवुन त्याच्या वसुलीसाठीही सर्वांनीच सहकार्य करावे. शेतक-यांनी कर्जाची परतफेड नियीमत करावी. स्वतःबरोबरच संस्थेच्या नांवलौकीकात भर घालावा त्यात भेदभाव करू नये. शेवटी संचालक विलासाराव वाबळे यांनी आभार मानले. 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे