सामाजिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा  माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते सत्कार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते  नुकताच  संपन्न झाला आहे. या वेळी तालुकाध्यक्ष.अनिल रणनवरे , ता.सल्लागार सोमनाथ लोहकरे , शहराध्यक्ष.रामदास कोपरे ता.उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव , शहर उपाध्यक्ष अनिस शेख ,शहर उपाध्यक्ष अमोल थोरात उपस्थित होते.यावेळी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे प्रतिनिधी व शहराचे प्रतिनिधी या सर्वांनाच कोपरगाव शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या मनातील प्रश्न शासन दरबारी ,वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी हे सर्व पदाधिकारी व संघटनेचे सर्व सभासद हे एक दिलाने सर्वे समाजाला बरोबर घेऊन एकदिलाने काम जनतेसाठी करणार आहेत .या सर्वांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या हितासाठी ,कामासाठी नगरपालिकेतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच या सर्वांबरोबर राहणार असे सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे