मुजीबभाई शेख यांचे पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने सत्कार
मुजीबभाई शेख यांचे पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने सत्कार
उत्तरनगर जिल्हा शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना.नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री मुजीबभाई शेख यांचे पुणतांबा शहरशिवसेनेच्या वतीने सत्कार समारंभ.उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना . 1982 /1983 पासुनचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक जिल्हाप्रमुख श्री मुजीबभाई शेख. उर्फ ( साबीरभाई शेख.) यांनी आज पुणतांबा येथे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख. शिवसेना नेते सुहासराव वहाडणे पा यांच्या निवासस्थानी भेट दिली असता. पुणतांबा शहर शिवसेना व बालशिवसेना यांच्या वतीने आमचे मार्गदर्शक जेष्ठ शिवसेना नेते सुहासराव वहाडणे पा यांच्या हस्ते व बालशिवसेना चि उत्कर्ष महेश कुलकर्णी याचे हस्ते भगवी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सुहासराव वहाडणे यांनी आपले मनोगतात सांगितले की नगरजिल्हा शिवसेना प्रथम स्थापना दिन 16/2/82 रोजी करण्यात आली. आजचे विद्यमान शहरप्रमुख महेश कुलकर्णी हे बालशिवसैनिक म्हणुन छोटे मोठे कार्य करत होते . महेश कुलकर्णी हे गेली 40 वर्ष आपले शिवसेना पक्षाचे काम कार्य निष्ठेनी करत आहे. तसेच त्यांचे चि उत्कर्ष हे जन्मजात कट्टर निष्ठावंत बालशिवसैनिक नॅशनल कराटे चॅपियंन आहेत. शिवसेना पक्षा साठी निस्वार्थ काम कार्य करत आहेत . आज पर्यंत त्यांना महाराष्ट्र राज्यातुन अनेक संस्थान कडुन दिले जाणारे समाजसेवा पुरस्कार प्राप्त झाले आहे . त्यांचे संपूर्ण कुटूंब शिवसेना पक्षाचे निष्ठे वर समाज कार्य करत आहे असे सांगितले. तसेच पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी आपले मनोगतात आपले विचार व्यक्त करताना सांगितले की. विद्यामान जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख संगमनेर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ते 1982/83 पासुनचे आमचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक व आमचे प्रति साबीरभाई शेख आहेत. असे सांगितले. तसेच मुजीबभाई शेख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की आपण मातोश्री चे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दवसाहेब ठाकरे. युवासेनाप्रमुख युवासम्राट अदित्यसाहेब ठाकरे यांनी माझे वर उत्तरनगर जिल्हा शिवसेनेची दिलेली जबाबदारी मी इमाने इतबारे पार पाडील. नवे जुने शिवसैनिकांचे संघटन करून आपण सर्वांनी शिवसेनेचे संघटन करण्या साठी प्रयॅत्न करावे. वरीष्ठ पातळीवरून काही गरज पडल्यास आम्ही त्यासाठी समक्ष आहे .मी पण कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहे. पुणतांबा हि दक्षिण काशी असलेले तांबेनगरी प्रसिध्द गाव आहे. या गावात च नगरजिल्ह्यात प्रथम शिवसेना स्थापना करण्यात आली. त्यावेळेचे व आताचे जेष्ठ कट्टर निष्ठावंत शिवसैनिक मला आठवते तसे. सुहासराव वहाडणे पा. शंकरराव शेलार. दत्ताभाऊ बोर्डे. सुरेश जुन्नरकर. रमेश लोळगे. भाऊसाहेब सांळुके. राजु पवार. राजाभाऊ गगे. व तत्कालीन बालशिवसैनिक व आजचे विद्यमान शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. यांनी वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन बबनराव घोलप साहेब. जिल्हाप्रमुख कै केशवराव थोरात. येवलेचे किशोर सोनवणेभाऊ यांच्या उपस्थितीत 16/2/82 रोजी शिवसेना स्थापन करून साखरसम्राटाचे किल्यात भगवा रोवण्याचे काम केले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे सांगुन पुणतांबा शहरशिवसेना व पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे कार्याचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका ग्रुप ग्रामपंचायत. जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीत संपूर्ण ताकदीने लढवून शिवसेनेचे सदस्य निवडून आणन्यासाठी प्रयत्न करून शिवसेना पक्ष घर तिथे शिवसैनिक व गाव तिथे शिवसेना निर्माण करण्यासाठी प्रयॅत्न करू असे सांगितले. प्रसंगी शिवसेना नेते सुहासराव वहाडणे पा. बालशिवसैनिक चि उत्कर्ष कुलकर्णी. शहरप्रमुख महेश कुलकर्णी. यांचे हस्ते नवनियुक्त जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांचा भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक विलास जगदाळे. सचिन पावबाके. निलेश गुजांळ . संकेत खुळे. आदी जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.




