आरोग्य व शिक्षणसंपादकीय
आयत्या मंजूर सरकारी योजनांचे श्रेय घेणाऱ्या कोपरगाव लोकप्रतनिधींचा दुटप्पीपणा उघड – वैशाली साळुंके
आयत्या मंजूर सरकारी योजनांचे श्रेय घेणाऱ्या कोपरगाव लोकप्रतनिधींचा दुटप्पीपणा उघड – वैशाली साळुंके
महिलांना बस प्रवासात 50% तिकीटदरात सवलतीच्या निर्णयाचे मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी महिला प्रवाशांची भेट घेऊन सत्कार करून स्वागत केले,याचे दुःख झाल्याने आमदार आशुतोष काळे यांच्याकडून वैशाली आभाळे यांनी सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्याबद्दल टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे,प्रत्यक्षात शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून विविध गतिमान निर्णय होतात त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे धावणारे आमदार काळे यांना व त्यांच्या पदाधिकऱ्यांना मात्र महिलांसाठी झालेल्या स्वागतार्ह निर्णयाचं दुःख का ? इतर वेळी श्रेयासाठी सर्वात पुढे आणि महिलांच्या बाबतीत मात्र दुटप्पीपणाचे वागणे असे खडेबोल भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली साळुंके यांनी कोपरगाव तालुका राष्ट्रवादीला सुनावले आहे.

शिंदे -फडणवीस गतिमान सरकार आल्यापासून अनेक लोककल्याणकारी निर्णयांचा अंमलबजावणी होण्याचा धडाका सुरू आहे.महिलांना बस तिकिटात ५०% सवलत,अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ,लेक लाडकी योजना अंतर्गत मुलींना 75000 चे अर्थसहाय्य,माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार असे अनेक निर्णय अर्थसंकल्पात करून त्याची अंमलबजावणी गतिमान पद्धतीने करणारे भाजपा-शिवसेना मित्रपक्षांचे हे सरकार आहे.या पूर्वी मतदारसंघाचा दृश्य स्वरूपाचा विकासाचा आलेख उंचवणाऱ्या प्रथम महिला आमदार मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी प्रशासकीय इमारती,रस्ते दळणवळण,जनतेचे मूलभूत प्रश्न,जनसामान्यांचे दैनंदिन भेडसावत असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठा निधी मतदारसंघासाठी मिळविला त्याचे श्रेय घेण्यासाठी कोल्हे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतांना तत्कालीन सरकारचे मंत्री आणून त्यांच्या हस्ते कोल्हे ताईंच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या प्रशासकीय इमारतींचे लोकार्पण घाई घाईने उरकून घेण्याचा असंवेदनशील प्रयत्न आमदार काळेंनी केला होता, यातच त्यांचा विचार किती कोत्या मनाचा आहे हे त्यामुळे महिला भगिनिसाठी आनंददायक निर्णय घेणारे सरकार आहे त्यामुळे निव्वळ कोल्हे विरोधाचा दृष्टीदोष करून घेत टीका टिपण्णी आपण एक महिला असताना करणे किती संयुक्तिक आहे हे सौ.आभाळे यांनी अंतर्मुख होऊन पहावे असा सणसणीत टोला साळुंके यांनी लगावला आहे.कोपरगाव मतदारसंघासाठी सरकारने काहीही निर्णय जाहीर केला किंवा केंद्र अथवा राज्य सरकारने विविध योजना अंतर्गत नियमाप्रमाणे मिळणारा निधी मिळाला की तो आपल्याच प्रयत्नातुन मिळविला असे भासवण्याचा खटाटोप आमदार काळे हे नेहमी करतात, प्रत्यक्षात मात्र ज्यांनी हा निधी दिला त्या पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री अथवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो न वापरता विद्यमान लोकप्रतिनिधी स्वतःचे फोटो झळकावून श्रेयासाठी जाहिरातबाजी आणि फलकबाजी करतात त्यामुळे मतदारसंघातील जनतेला यांचा सर्व कावेबाज कारभार ठाऊक असून त्यांचे मनसुबे कायमच उघडे पडले आहे.ज्या वेळी आरोग्य सुविधेअभावी ग्रामीण रुग्णालयाबाहेर महिला भगिनी बाळंत होण्याचा दुर्दैवी प्रकार घडल्यानंतर एक चकार शब्द न काढणाऱ्या तुमच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी कुठे होते ? व तुम्ही मूक गिळून गप्प का होतात ? असा संतप्त सवाल साळुंके यांनी कोपरगाव राष्ट्रवादीला केला आहे.महिलांना दुय्यम वागणूक देणारे आमदार काळे यांच्या वतीने सरकारने महिलांबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होण्याऐवजी आपल्याला श्रेय मिळणार नाही याच दुःख होऊन टीका टिपण्णीचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे हे मतदारसंघासाठी दुर्दैवी आहे असे मत वैशाली साळुंके यांनी व्यक्त केले आहे



