सामाजिक

स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पथदिव्यांचे लोकार्पण

स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त पथदिव्यांचे लोकार्पण
संपादक:- रविंद्र जगताप
माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या जयंतीनिमित्त संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज ते स्टेशन रोड दरम्यान पंचायत समिती सदस्या सौ.सुनीता कैलास संवत्सरकर यांच्या निधीतून बसवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचे (पथदिवे)लोकार्पण मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी कोपरगाव मतदारसंघात तळागाळातील नागरिकांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.शेती,वीज,पाणी यासारखे अनेक विषय त्यांनी तडीस नेऊन प्रश्न सोडवण्यासाठी जनआंदोलने उभारून प्राधान्य दिले.
स्व.कोल्हे साहेबांनी राजकिय कारकीर्द सूरु केली त्या काळी सर्वच खेडोपाडी रस्ते, वीज,उद्योग पोहचले नव्हते अशा काळात अनेक गावांत वीज पोहचवण्यासाठी कोल्हे साहेबांचे योगदान मोठे राहिले आहे.सरपंचपद ते आमदार असा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून स्व. कोल्हे साहेबांचा प्रतिनिधित्व करत विकास कामाचा आलेख मोठा राहिला आहे असे प्रतिपादन मा.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.या प्रसंगी उपस्थीत श्री कैलास संवत्सरकर, श्री राजेंद्र लोणारी, श्री यादवराव संवत्सरकर, सरपंच डाॅ श्री विजय काळे, श्री भिमा संवत्सरकर, माजी सरपंच सौ.सुनिता संवत्सरकर, लक्ष्मीकांत संवत्सरकर, दत्तु भालेराव, बाळासाहेब सोनपसारे, गणेश राऊत, अशोक वराट, मनोज ईंगळे, राहुल सुपेकर, मंगेश गायकवाड, दिलीप शुक्ला, सतीश निकम, गणेश एलांडे, शिवा सुपेकर,सागर संवत्सरकर, नानासाहेब निकम आदिंसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे