गोदावरी नदी जवळील संरक्षण भिंती लगत धसलेले चेंबर दुरुस्ती करावे आणि घाटाच्या जवळील खड्डे बुजवावे:- आदिनाथ ढाकणे
गोदावरी नदी जवळील संरक्षण भिंती लगत धसलेले चेंबर दुरुस्ती करावे आणि घाटाच्या जवळील खड्डे बुजवावे:- आदिनाथ ढाकणे
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव :-के जे सोमय्या कॉलेज च्या समोरील गट्टारीचे चेंबर धसले आहे. जर एखादा मोठा पाऊस झाला तर चेंबर बरोबरच गोदावरी नदी ची संरक्षण भिंत पडण्याची दाट शक्यता आहे आणि कै सॄर्यभान वहाडणे घाटाच्या जवळ आणि बेट कोपरगांव ला जोडणारा पुल यांच्या मध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे यामुळे पुलाला आणि घाटाला धोका निर्माण झाला आहे.


तरी आपण त्वरित लक्ष घालून हे काम तातडीने पूर्ण करावे असे निवेदन नगरपालिकेस गोदामाई प्रतिषठाणचे अध्यक्ष आदिनाथ टाकणे यांनी दिले आहे 7.9.2024 पासून गणपती बाप्पा चे आगमन होते आहे यामुळे या भागात नागरीकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात असणार कुठल्याही दुर्घटना होऊ नये म्हणून आज सहाय्य नगररचना अधिकारी श्रीमती रश्मी प्रदान यांना आज दि.4.9.2024 रोजी निवेदन देऊन लवकरात लवकर काम करण्याची मागणी त्यांनी केली आहे


