विविध समस्यां, मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक, रस्त्यावर उतरत भव्य जनआक्रोश मोर्चा
विविध समस्यां, मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक, रस्त्यावर उतरत भव्य जनआक्रोश मोर्चा
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव नगरपालिका नागरिकांना मूलभूत सेवा देण्यात अपयशी झाल्याबाबत नगरपालिकेची कानउघाडणी करण्यासाठी त्याचा जाब विचारण्यासाठी तसेच विविध समस्यां, मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाला असून आज त्यांनी रस्त्यावर उतरत भव्य जनआक्रोश मोर्चा नगरपालिकेवर नेला आहे. सदर मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

सदर जन आक्रोश मोर्चास शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पासून सुरवात होऊन हा मोर्चा नगरपालिकेवर धडकला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांना रोज स्वच्छ पाणी, चांगल्या सेवा सुविधा मिळाव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकाचे शासकीय लोकार्पण व्हावे, खुले नाट्य गृहाचे काम तात्काळ सुरू करावे तसेच शहरातील विविध प्रलंबित कामे तात्काळ करावी या विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले असून सदर मागण्या पूर्ण न झाल्यास कोपरगाव बंदची हाक देत तीव्र स्वरूपाचे आंदोलन, आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात.
जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, युवक जिल्हाअध्यक्ष प्रदीप बनसोडे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राज्य सचिव दिपक गायकवाड.महिला जिल्हा उपाध्यक्ष वैशाली सोणवने, महिला तालुका अध्यक्ष अलका देवगावकर तालुका सल्लागार सोमनाथ लोहकरे.तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे. शहर अध्यक्ष रामदास कोपरे, उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव,उपशहरप्रमुख अनिस शेख, सुनिल खरात, अमोल थोरात,अविनाश मोरे, राहुल सोणवने, आकाश डोखे, प्रशांत मेहरखांब, संदीप दुशिंग आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


