श्रीरामपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्रातील श्री. नितीन बाळासाहेब साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत पीएचडी पदवी प्रदान

श्रीरामपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्रातील श्री. नितीन बाळासाहेब साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत पीएचडी पदवी प्रदान
कोपरगाव प्रतिनिधी :-रयत शिक्षण संस्थेचे, चंद्ररूप डाकले जैन महाविद्यालय, श्रीरामपूर येथील वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्रातील श्री. नितीन बाळासाहेब साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्फत नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. प्रा.नितीन साळवे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये “A Study of Impact of Globalization on Tourism and Hospitality Business in North Maharashtra” हे शिर्षक घेऊन शोध प्रबंध सादर केला. त्यांना गाईड म्हणून पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य व प्राचार्य डॉ. एस.आर. बखळे व को-गाईड म्हणून डॉ. व्ही. बी. निकम यांचे मार्गदर्शन लाभले. गठीत कमिटीत चेअरमन म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सेंट विन्सेंट कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ.अडसुळे ए .बी. तसेच रेफरी म्हणून नांदेड विद्यापीठ संलग्नित के.आर.के. आणि बी.आर.एम. सी.कॉलेज मानवत, नांदेड येथील डॉ. बी.एस. गीते, सी. डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर येथील प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अनिकेत खत्री यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागात Ph.D. Viva-voce पार पडली.

त्यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, डायरेक्टर डॉ. बी.एस. सावंत, प्राचार्य डॉ. एम. टी. सरोदे, प्राचार्य डॉ. के एच. शिंदे, माजी प्राचार्य डॉ. जी. टी. सांगळे, माजी प्राचार्य डॉ. पी.एन.गायकवाड, माजी प्राचार्य डॉ. एल.डी.भोर, डॉ. बी.बी.निघोट, प्र. प्राचार्य डॉ. के.पी.काकडे, माजी प्राचार्य डॉ. आर.आर.सानप, प्रा.डॉ. सी.जे. खिलारी, डॉ. गोरख बारहाते, डॉ. मोहन सांगळे, डॉ. एम. ए. केकाने, डॉ. सादिक सय्यद, डॉ. एस.एस.भोला आदींसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुप वर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
डिलिमिटेशन २०२६ ला भारतात ७५३ लोकसभेच्या जागा होणार का? सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
शनी शिंगणापुर येथे शनीदेवाला आता ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
https://youtu.be/21ubIXLgOn0?si=FEp-QRlGZk_1Wz1U
संपादक रवींद्र जगताप


