सामाजिक

कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने भिम जयंती २०२३ चे आयोजन

कोपरगाव शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतिने भिम जयंती २०२३ चे आयोजन

जयंती कमिटी जाहीर

संपादक :- रविंद्र जगताप

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त  दि 2.3.23रोजी दुपारी 12. वाजता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अनिल बनसोडे, साईनाथ जाधव, सतीश गुंजाळ, बापुसाहेब ठोँबरे,मोहनराव शिरसाठ, संजय त्रिभुवन, वैभव राजगुरू, रंजनीताई लासे, शितल गोडगे, आशाताई शिरसाठ,सुनीताताई पाटोळे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते.यावेळी मिटींग आनंदात पार पडली व वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजनकरण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कमिटी जाहीर करण्यात आली.ती पुढीलप्रमाणे
१) विजयराव जाधव (अध्यक्ष)
२) सुनीताताई मुंतोडे (उपाध्यक्ष)
३) संजयजी लोंढे (कार्यअध्यक्ष)
४) संजयजी कोपरे (उपाध्यक्ष )
५) सविताताई वाघ (सेक्रेटरी)
६) राजेंद्र मोकळ (खजिनदार )
तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कमिटीचे शरद खरात यांनी अभिनंदन केले. व संजय लोंढे यांनी दिवंगत बाजीराव रनशूर याना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मिटींग ची सांगता केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे