सामाजिक

संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड

संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव:-भारत सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय तसेच शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी संवत्सर येथील रहिवासी व सद्या नाशिक येथील ईएमआरएस शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुनील केशवराव भाकरे यांची निवड झाली.नवी दिल्ली येथे भारत सरकारचे जनजातीय कार्य मंत्रालय तसेच नॅशनल सोसायटी फॉर सायबर स्टुडंटस् एज्युकेशन नेस्टच्यावतीने श्री भाकरे यांचा विशेष मानपत्र व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम देऊन नुकताच गौरव करण्यात आला. या गौरव सोहळ्यासाठी आयुक्त असित गोपाल, सहआयुक्त के. सी. मीणा, सहआयुक्त बिपीन रतोडी, सहाय्यक आयुक्त श्रीमती इंदिरा मुदगल आदी मान्यवर उपस्थित होते. श्री भाकरे यांनी शिक्षकी कामकाज सांभाळताना संवत्सर व बाहेरील असंख्य विद्यार्थ्यांना घडविले असून या क्षेत्रात त्यांनी नांवलौकीक मिळविलेला आहे. वेगवेगळा संशोधनासह विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी अनेक उपयुक्त असे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत. या कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या जनजातीय मंत्रालय व शिक्षण विभागाने त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड केली.

शिक्षक सुनील भाकरे हे संवत्सर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै. केशवराव भाकरे यांचे चिरंजीव आहेत. या पुरस्काराबद्दल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील, सरपंच सौ. सुलोचना ढेपले, उप सरपंच विवेक परजणे, पत्रकार शिवाजीराव गायकवाड, बाळासाहेब दहे आदिंनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे