क्रिडा व मनोरंजन
टिळक चौक प्रीमियर लीग विवेकभैय्या कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
टिळक चौक प्रीमियर लीग विवेकभैय्या कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
टिळक चौक प्रीमियर लीगमुळे कोपरगावच्या खेळाडूंना राज्य व देश पातळीवर खेळण्याची संधी मिळेल -विवेकभैय्या कोल्हे
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : तरुण पिढी सध्या मोबाईलच्या आहारी गेली असून, मोबाईलवर गेम खेळण्यातच युवा पिढीचा अधिक वेळ जात आहे. आजच्या युगात मैदानी खेळाचे महत्त्व वाढविण्याची गरज असून, टिळक चौक क्रिकेट क्लबने दरवर्षीप्रमाणे यंदाही टिळक चौक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे सुंदर पद्धतीने आयोजन करून कोपरगाव शहर व तालुक्यातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आपल्या भागातील खेळाडूंना भविष्यात रणजी चषक क्रिकेट स्पर्धेसह राज्य व देश पातळीवर तसेच भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी नक्की मिळेल आणि हे खेळाडू कोपरगावचा नावलौकिक वाढवतील, असा आशावाद सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केला.


कोपरगाव येथील टिळक चौक क्रिकेट क्लबच्या वतीने संजीवनी क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित टिळक चौक प्रीमियर लीग (टीसीपीएल) विवेकभैय्या कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धा २०२३ चे उद्घाटन आज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते थाटात झाले. त्यावेळी ते बोलत होते. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या क्रिकेट स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगरसेवक तथा राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव लकारे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, नगर परिषदेतील माजी गटनेते रवींद्र पाठक, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, जनार्दन कदम, विवेक सोनवणे, वैभव आढाव, सुशांत खैरे, दिनेश कांबळे, शिवाजीराव खांडेकर, कोपरगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा एस. जी. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, मनोज कपोते, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे नेते जितेंद्र रणशूर, अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, गोपीनाथ गायकवाड, दादासाहेब नाईकवाडे, सिन्नू भाटिया, रवींद्र रोहमारे, विजय गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, सचिन सावंत, सोमनाथ गंगुले, शुभम गवारे, मंगेश सोनवणे, जयप्रकाश आव्हाड, हाशमभाई पटेल,राजेंद्र गंगुले आदींसह टिळक चौक क्रिकेट क्लबचे पदाधिकारी, क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवेकभैय्या कोल्हे यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व गेल्या दोन वर्षापासून टिळक चौक प्रीमियर लीग (टीसीपीएल) विवेकभैय्या कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात येत असल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, टिळक चौक क्रिकेट क्लबच्या वतीने घेण्यात येणाऱ्या टिळक चौक प्रीमियर लीग (टीसीपीएल) ने कोपरगाव तालुक्यासह सर्वदूर लौकिक प्राप्त केला आहे. टिळक चौक क्रिकेट क्लबच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनपूर्वक या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून, या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील अनेक नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. टिळक चौक क्रिकेट क्लबने ‘आयपीएल’ च्या धर्तीवर लिलाव प्रक्रियेतून खेळाडूंची निवड करून या प्रीमियर लीगचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमुळे कोपरगाववासियांना आगामी काही दिवस उत्कृष्ट खेळ पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. क्रिकेट रसिकांनी या पर्वणीचा लाभ घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले. क्रिकेट हा मैदानी खेळ असून, भारतासह अनेक देशांमध्ये हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. क्रिकेट हा आता सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे. खेळामध्ये हार-जीत होत असते. खेळात पराजित झाल्यावर खेळाडूंनी नाउमेद न होता विजय मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण चांगला खेळ खेळून यश मिळवले पाहिजे. टिळक चौक प्रीमियर लीग विवेकभैय्या कोल्हे चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या भागातील क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखविण्याची एक चांगली संधी मिळाली आहे. टिळक चौक प्रीमियर लीगमध्ये खेळलेल्या खेळाडूंना आगामी काळात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी निश्चितच मिळेल आणि हे खेळाडू कोपरगावचे नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली.


