सामाजिक

बार्टीला बंद पाडण्याचे षडयंत्र भिमसैनिक उधळुन लावतील :गौतमराव बनसोडे

बार्टीला बंद पाडण्याचे षडयंत्र भिमसैनिक उधळुन लावतील :गौतमराव बनसोडे

बार्टीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (बीएएनआरएफ) ही फेलोशिप दिली जाते. दरवर्षी ठाराविक विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र महाज्योती आणि सारथी या संस्थांकडून ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिली जाणारी फेलोशिप सरसकट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर बार्टीनेही सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली होती. त्यासाठी गेल्या ५२ दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. बार्टीत सर्व विद्यार्थांना सरसकट फेलोशिप द्यावी  अशी मागणी घटनाकार मैत्रि संघाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांनी केली आहे.बार्टीच्या विरोधात अनेक षडयंत्र चालु आहे. बार्टीला बंद पाडण्याचा काहीचा डाव आहे.परंतु भिमसैनिक हे षडयंत्र उधळुन लावतील. असे गौतम बनसोडे म्हणाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे