धार्मिक

शिर्डी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न अध्यक्ष ना. आशुतोष काळेंनी मानले आभार

शिर्डी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे.

शिर्डी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न अध्यक्ष ना. आशुतोष काळेंनी मानले आभार

 शिर्डी प्रतिनिधी :- कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे शासनाकडून सर्व निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे विश्वस्त मंडळाने यावर्षी रामनवमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे साई भक्तांनी स्वागत करून उत्सव काळात मोठ्या संख्येने हजेरी लावून श्री साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला. सर्व साईभक्तांना संस्थानच्या वतीने चांगल्या प्रकारे सोयी सुविधा देवू शकलो याबद्दल समाधान वाटत असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी सर्व शिर्डी ग्रामस्थ, श्री रामनवमी उत्सव कमिटी, संस्थान अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व पत्रकार बांधवांनी अनमोल सहकार्य केले त्याबद्दल विश्वस्त मंडळाचे वतीने अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत सर्वांचे मनापासून आभार मानले आहे.शिर्डी येथील श्री रामनवमी उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. त्या  बाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच शिर्डी येथे पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. श्री रामनवमी उत्सव काळात श्री साईबाबा संस्थानने साई भक्तांसाठी करण्यात आलेल्या सोयी, सुविधांचा भक्तानी लाभ घेतला. साई भक्तांनी विश्वस्त मंडळाच्या आव्हानाला प्रतिसाद देवून मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. साई बाबांच्या झोळीत भक्तांनी भरभरून दान दिले त्याचबरोबर या उत्सवाच्या निमित्ताने शिर्डीचे अर्थकारणाला देखील चालना मिळाली त्याबद्दल साई भक्तांबरोबरच सर्व संबंधित घटकांचे आभार मानून सविस्तर माहिती दिली.यावेळी बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. त्यामुळे निर्बंध घालण्यात येवून सण उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करण्यात कायदेशीर मनाई होती. योगायोगाने मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करून माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. मागील काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बध मागे घेतले होते. त्यामुळे विश्वस्त मंडळाने पारंपारिक पद्धतीने श्री रामनवमी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे देश विदेशातील साई भक्तांनी स्वागत करून साई दर्शनाचा लाभ घेतला. श्रीरामनवमीच्या तीन दिवसाच्या उत्सव काळात जवळपास ३ ते सव्वा ३ लाख भाविकांनी साई दर्शन घेतले.

श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, द्वारावती व श्री  साईप्रसाद निवासस्‍थान आदी निवासस्‍थानांच्‍या माध्‍यमातुन सुमारे १८ हजार ५०० भाविकांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली.मुंबईसह राज्‍याच्‍या कानाकोपऱ्यातून आलेल्या ५३ पालख्‍यांतील सुमारे १० हजार पदयात्रींची श्री साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आली. उन्‍हाची तीव्रता लक्षात घेवून संस्‍थानच्‍या वतीने मंदिर व मंदिर परिसरात तसेच मंदिरालगतच्‍या मार्गांवर मंडप उभारण्‍यात आले होते दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था केली होती. साईभक्तांच्या अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साईबाबा भक्त निवासस्थान (५००रुम) व साई धर्मशाळा आदी ठिकठिकाणी कापडी मंडप उभारण्‍यात आले होते.त्या ठिकाणी विद्युत पुरवठा व पाणी पुरवठ्याची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली होती.मुंबई-शिर्डी महामार्गावर पालखीतील पदयात्रींसाठी ठिकठीकाणी पिण्याच्या पाण्याचे टॅकर व तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध मिळावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. या तीन दिवसात १ लाख ४५ हजार ५९४ भाविकांनी प्रसादालयात भोजनाचा लाभ घेतला. १ लाख १५ हजार भाविकांनी नाष्टा पाकीटाचा लाभ घेतला. २ लाख २० हजार भाविकांनी लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. या तीन दिवसात भाविकांनी साईबाबांच्या झोळीत साई भक्तांनी ४ कोटी ५७ लाख ९१ हजार १८७ रुपये रोख स्वरुपात दान केले आहे. १५ लाख ६४ हजार २०९ रुपयांचे ३३२.८० ग्रॅम सोने व ४ लाख ५० हजार ५४६ रुपयांची ७६७३ ग्रॅम चांदी व ११ लाख २० हजार २२६ रुपयांचे परकीय चलन मिळाले असल्याचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळातही शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांसाठी उत्कृष्ठ सेवा-सुविधा देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान व विश्वस्त मंडळ कटिबद्ध राहील त्यासाठी सर्वांनी यापुढील काळात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे