भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दिव्यागांना वाकरचे वाटप
भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दिव्यागांना वाकरचे वाटप
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे कोपरगाव शहरांमधील अनुसूचित जाती जमाती मोर्चा भाजपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने दिव्यांग बांधवांना वाकरचे वाटप करण्यात आले आहे कोपरगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती जमाती मोर्चाच्या वतीने माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे बिपिन दादा कोल्हे ,विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे .अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर बिराडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून कोपरगाव शहरांमधील विशाल शेजवळ रोहित शेजवळ यांना वाकर भेट दिली आहे.कोपरगाव शहरातील काकासाहेब कायटे यांच्या देणगीतुन वाँकर उपलब्ध झाले होते.दिव्यांग बांधवांना वाकर मिळाल्यामुळे त्यांना आनंद झाला होता.मा. नगरसेवक जयवंत मरसाळे त्याचबरोबर पैलवान सुरेश भाई चावरे पैलवान सोमनाथ ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला आहे .याप्रसंगी संजय खरोटे गौरव देवडे रोहिदास पाखरे सुनील डोळस मेहमूद सय्यद मंगल ताई गंगावणे रमाताई चावरे कौशल्या ताई कळवसे सुभाष अहिरे सचिन कोपरे परशुराम डुमणे योगेश गुरु आदि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते



