जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील,चासनळी या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पाटील,चासनळी या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशवराव चांदगुडे पा.चासनळी या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये स्नेहसंमेलनाचे चे आयोजन करण्यात आले होते. चासनळी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.सूनिताताई बनसोडे , गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक पंडीतभाऊ चांदगुडे,नानासाहेब बनसोडे,संजय चांदगुडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत माळी सर्व सदस्य,संतोष पऱ्हे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांचे हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

पंचायत समिती कोपरगावचे साधन व्यक्ती विवेक सोनवणे सर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.शाळेतील पालक सचिन हरिभाऊ चांदगुडे व योगेश हरिभाऊ चांदगुडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ विशेष नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,051 रुपये बक्षीस स्वरूपात दिले. यावेळी गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक पंडितराव चांदगुडे यांनी आपल्या मनोगतात स्नेहसंमेलनाचे आयुष्यातील महत्त्व सांगितले. तसेच सन्मा.बनसोडे साहेब यांनी मराठी शाळेतील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.गावातील संजय शिंदे यांनी शाळेसाठी मोफत लाईट माळ सजावट करून दिली.यावेळी चासनळी केंद्रातील सर्व शिक्षक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी चिमुरड्यांनी देवा श्री गणेशा या गीताने श्री गणेशाला साकडं घालत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर मराठमोळ गाणं, एकच राजा, पढोंगे लिखोगे,चला जेजुरीला जाऊ, केळेवाली, गरबा गीत, झुमका वाली पोरं, राजं आल, वंदे मातरम असे विविध गीते सादर करण्यात आली.यानंतर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, शेतकरी गीते, लोक गीते, गमतीदार उखाणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.सांस्कृतिक कार्यक्रमातील गाणी बसविण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोगरे मॅडम व साबळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर, मिननाथ माळी,भीमा गोडे, सिताराम कचरे, संतोष पारासुर या सर्वांनी हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.इतके सुंदर कार्यक्रम असणारे वार्षिक स्नेहसंमेलन झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचलन आपल्या अनोख्या शैलीत शाळेतील उपशिक्षक संतोष पारासूर यांनी केले.
कोपरगाव टिळकनगर येथे जय लक्ष्मी आई यात्रा निमित्ताने सोनु साठे यांचा संगीत भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
कोपरगावात महाराष्ट्राचे प्रसिध्द गायक अनिरुध्द वनकर यांचा प्रबोधन गायनाचा कार्यक्रम संपन्न सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा, व कोपरगावातील बातम्यासाठी या चँनलला सबस्क्राईब करा
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा



