महाराष्ट्र

आ. आशुतोष काळेंची मागणी मान्य आर.टी.ओ. कॅम्प मध्ये नवीन लर्निंग लायसन्स देणे पूर्ववत सुरु

आ. आशुतोष काळेंची मागणी मान्य आर.टी.ओ. कॅम्प मध्ये नवीन लर्निंग लायसन्स देणे पूर्ववत सुरु

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव येथे आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देणेची सुविधा एप्रिल महिन्यापासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून लर्निग लायसन्स देणेची सुविधा पूर्ववत सुरु करण्याची परिवहन आयुक्तांकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून पुढील महिन्यापासून वाहनधारकांना नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षापासून कोपरगावला प्रत्येक महिन्याला आर. टी. ओ. कॅम्प होत असून त्यामुळे वाहनधारकांची मोठी सोय होत होती. या कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देखील मिळत असल्यामुळे वाहनधारकांना नवीन लायसन्स काढणे सहज शक्य होते. परंतु श्रीरामपूरच्या परिवहन अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यापासून या कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा बंद केल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली होती.त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी राज्यांच्या परिवहन आयुक्तांना पत्र व्यवहार करून कोपरगाव येथे आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देणेची सुविधा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी करून सविस्तर लेखी निवेदन दिले होते.आ.आशुतोष काळे यांच्या त्या निवेदनाची राज्यांच्या परिवहन आयुक्तांनी तातडीने दखल घेवून श्रीरामपूर परिवहन विभागाला कोपरगावला होणाऱ्या आर.टी.ओ. कॅम्पमध्ये नवीन लर्निग लायसन्स देण्याची सुविधा पूर्ववत सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिवहन विभागामार्फत कोपरगाव येथे दर महिन्याला होणाऱ्या आर.टी.ओ.च्या तीन कॅम्पच्या माध्यमातून वाहनधारकांना लर्निंग लायसन्स देण्याची सुविधा सुरु होणार असून वाहनधारकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी श्रीरामपूर येथे जाण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय दूर केल्याबद्दल असंख्य वाहनधारकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आ

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे