राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे -महेंद्र विधाते
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे -महेंद्र विधाते
कोपरगाव प्रतिनिधी- सम्यक फाउंडेशन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून सामान्यांची सेवा करत आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान देखील फाउंडेशन करत असते. सामजिक,शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय पत्रकारिता, महिला रोजगार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान 31 मे 2023 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे .त्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी दहा मे पर्यंत संस्थेच्या कार्यालयात आपला प्रस्ताव बाबा कॉम्प्लेक्स खंदक नाला मेन रोड कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संस्थेच्या या कार्यालयात सादर करावा. पुरस्कार कमिटीच्या तपासणीनंतर पुरस्कार घोषित करून त्यांना 31 मे रोजी सन्मानित करण्यात येईल असे फाउंडेशन महिंद्र विधाते यांनी सांगितले आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी या 79729 78214 क्रमांकावर संपर्क साधावा

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo
काय आहे बारसु प्रकल्प,कोण विरोधक? कोण समर्थक, जाणुन घ्या फायदे तोटे आणि विरोधाचे कारणे



