आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे शहीद दिनानिमित्त कोपरगाव मध्ये अभिवादन
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे शहीद दिनानिमित्त कोपरगाव मध्ये अभिवादन
संपादक :- रविंद्र जगताप
– भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावले. अनेकांच्या छोट्या मोठ्या लढाया यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे कार्यही असेच. त्यांच्या ऐतिहासिक जाज्वल्य कामगिरीला उजाळा देण्याचं कार्य आदिवासी महादेव कोळी युवक संघ गेल्या अनेक वर्षांपासुन करत आहे. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या शहीद दिनानिमित्त संघटनेच्या वतीने कोपरगाव मध्ये वृंदावन नगर समता नगर या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन अभिवादन केले. यावेळी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे आठवडे बाजार कोपरगांव आदी ठिकाणी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे मार्गदर्शक मनोहर लक्ष्मणराव शिंदे,मा,शरदराव लक्ष्मणराव शिंदे बाळासाहेब भांगरे सुनील पोरे गोविंद आढळ मधुकर लंगोटे नारायण चौरे आदींसह अनेकजण उपस्थित होते.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2




