ब्रेकिंग

शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रम -स्नेहलताताई कोल्हे

शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रम -स्नेहलताताई कोल्हे
काकडी येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्त कोपरगाव पंचायत समितीमध्ये आढावा बैठक
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे.या ऐतिहासिक व लोकाभिमुख उपक्रमाच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात हजारो लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे, असे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या तयारीनिमित्त बुधवारी (९ ऑगस्ट) कोपरगाव येथील पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
काकडी येथे होणाऱ्या कार्यक्रमास कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या नियोजनाबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची स्नेहलताताई कोल्हे यांनी सविस्तर माहिती घेऊन बस वाहतुकीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. काकडी येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी लाभार्थी वेळेत पोहोचतील यादृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या नोडल व समन्वयक अधिकाऱ्यांनी गावनिहाय नियोजन करावे. कार्यक्रमास येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य पथक, रुग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सुचवले. स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटले तरी कोपरगाव मतदारसंघात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. पाण्याची समस्या बिकट बनली आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले ‘महाबीज’ कंपनीचे सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी व बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन गतिमान पद्धतीने काम करत आहे.  जनहिताची कामे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचेही भरीव सहकार्य मिळत आहे. राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी करत आहेत, असे त्यांनी सांगितले.या बैठकीस आ. आशुतोष काळे, तहसीलदार संदीप भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव वक्ते, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक त्र्यंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, सतीश आव्हाड, राजेंद्र कोळपे, रमेश गवळी, सतीश केकाण, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, रिपाइंचे दीपक गायकवाड, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, भाजप शहर सरचिटणीस जयेश बडवे, दिव्यांग मोर्चाचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे,  किसान मोर्चाचे शहराध्यक्ष सतीश रानोडे, अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी, संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, रवींद्र रोहमारे, दीपक चौधरी, सरपंच रवींद्र आगवन (करंजी), जयराम वारकर (खोपडी), कैलास रहाणे, शिवाजीराजे जाधव, संदीप देवकर, जगदीश मोरे, चंद्रकांत वाघमारे, पिंकी चोपडा, किरण सुपेकर, संतोष नेरे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, राजेंद्र औताडे, दत्तात्रय गुंजाळ, देविदास रोठे, दत्तात्रय शिंदे, विजय डांगे, अनिल शिंदे, महेश माळी, मुख्तार पठाण आदींसह शासकीय अधिकारी, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न संस्था, भाजप व इतर पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेचे माजी सदस्य, शेतकरी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे