आरोग्य व शिक्षण

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी संपन्न

श्रीमान गोकुळचंद विद्यालयात विदयार्थी आरोग्य तपासणी संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामध्ये नुकतीच सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागरूक पालक सदृढ बालक अभियान अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. या अभियाना अंतर्गत सर्व शासकीय शासकीय शाळा, खाजगी शाळा येथिल शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या मुला मुलींची तपासणी होणार आहे. या तपासणी दरम्यान आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भसेवा देण्यात येणार आहेत अशी माहीती मा.डाॕ.सचिन यादव यांनी दीली. या आरोग्य तपासणी अभियाना करीता कोपरगांव ग्रामीण रुग्णालयातून एक वैद्यकीय पथक विद्यालयामध्ये हजर होते.या पथकांमध्ये डाॕ.जितेंद्र रणदिवे,डाॕ.काजल गलांडे,डाॕ.दीपाली आचार्य,डाॕ.मनिषा बेंद्रे व डाॕ.सपना भंडारी यांचा समावेश होता. या आरोग्य पथकामार्फत सलग दोन दिवस विदयार्थीची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीतून आवश्यकतेनुसार बालकांना आरोग्य केंद्रात मंगळवार आणि शुक्रवारी तसेच ग्रामिण रुग्णालयात शनिवारी तपासणी करीता पाठवण्यात येणार आहे. या सर्व तपासणीत पुढील उपचाराची आवश्यकता असल्यास बालकांना जिल्हा रुग्णालय ,उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यामध्ये पाठविण्यात येणार आहे. हे आरोग्य तपासणी अभियान पुढील दोन महिन्यांमध्ये राबविण्याचे आरोग्य तपासणीचे नियोजन आहे. अशी माहीती वैदयकीय अधिकारी डाॕ.जितेंद्र रणदीवे यांनी दीली.या वेळी या वैदयकीय पथकांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर आभार उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे