“महिला निबंध ” स्पर्धेचा निकाल जाहीर

“महिला निबंध ” स्पर्धेचा निकाल जाहीर
संपादक:- रविंद्र जगताप
महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांचे विद्यमानाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘आधुनिक महिला’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या निबंध स्पर्धेत राज्यभरातून अनेक शिक्षकांनी सहभाग घेतला या निबंध स्पर्धेत कोपरगाव नगरपालिका शाळा क्रं.६ येथील शिक्षिका श्रीम.आरती गंगाधर कोरडकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला द्वितीय क्रमांक नूतन मराठी शाळा,राहुरी येथील स्वाती माणिक कावरे, तृतीय क्रमांक न.पा.शाळा क्रं.५,कोपरगाव येथील सौ.नसरीन सलीम इनामदार, उत्तेजनार्थ न.पा.शाळा क्रं.१,कोपरगाव येथील सौ.सविता अवधूत भोसले यांनी मिळवला या त्यांच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य नपा मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री.अर्जुन कोळी सर,सरचिटणीस अरुण पवार,कबाडी सर,रहाणे सर,माळी सर,कदम सर,पगारे सर तसेच कोपरगाव नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी पटारे साहेब मुख्याधिकारी गोसावी साहेब यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे





