आरोग्य व शिक्षणगुन्हेगारी

कारवाडीच्या घटनेची लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवुन दोषींना निलंबित करा :- नितिन शिंदे

 

कारवाडीच्या घटनेची लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेवुन दोषींना निलंबित करा :- नितिन शिंदे

 संपादक:- रविंद्र जगताप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 3 ऑगस्ट २३, रोजी सौ रेणुका किरण गांगुर्डे, यांना प्रस्तुती कळा आल्यानंतर शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी ऍडमिट होण्यासाठी गेले असता, त्यावेळेस  तेथील परिचारका यांनी असं सांगितलं की , डॉक्टर उपलब्ध नाहीत व रुग्णवाहिका चालू करण्यास इंधन नाही. तरी आपण शेजारील धामोरी उपकेंद्रात घेऊन जावे. तेथे गेल्यानंतर रेणुका हि बाळंतीण झाल्यानंतर अतिरक्तस्श्रावत तिचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र शासन एकीकडे सांगत की सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी हजारो कोटींचा खर्च करतं आहे. अत्याधुनिक ॲम्बुलन्स डिझेल अभावी विनाकामाच्या उभ्या आहेत. कधीतरी महिन्यातून रुग्णवाहिकेची गरज पडते , हजारो कोटीची मालमत्ता सामान्य जनतेच्या कुचकामाची ठरत आहे. दर महिन्याला लाखोंचा पगार असणारे डॉक्टर सामान्य जनतेच्या जर उपयोगी पडत नसतील व एकीकडे आपण सांगतो हे सामान्य जनतेच सरकार आहे ,तर हा प्रचंड विरोधाभास आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये सातत्याने सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळलं जात आहे. गेले काही महिन्यापूर्वीच शहरातील दवाखान्यात बाव्वन पैकी दोनच कर्मचारी हजर होते अशी दयानिय परिस्थिती तसेच चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी झालेला सामान्य रुग्णाचा मृत्यू. हे सर्व काही बेसिस्त व मनमानी कारभार चाललेलं आहे,याची वेळीस लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य ते शासन करुन निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अन्यथा लवकरच आंदोलन छेडले जाईल. असं निवेदन कोपरगाव काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले, त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री नितीनराव शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, जिल्हा सरचिटणीस सुनील साळुंखे, जिल्हा किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव जाधव, कोपरगाव परिवहन तालुका अध्यक्ष छबुराव शिंगाडे, चंद्रकांत बागुल, अँड.शितलताई देशमुख, यादवराव त्रिभुवन, रौनक अजमेरे, राहुल गवळी, ज्ञानेश्वर भगत व इतर हजर होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे